आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौलताबाद घाटात अपघात; ८ जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - दौलताबाद घाटात काळीपिवळी व कार यांच्यात झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात घडला.
काळीपिवळी जीप (एमएच २० एए ४६३८) ही प्रवासी घेऊन औरंगाबादहून खुलताबादकडे निघाली होती. घाट चढत असताना औरंगाबादकडे जाणारी स्विफ्ट कार (एमएच २० डीजे ४१४) घाटातून दुस-या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काळीपिवळीला समोरासमोर धडकली. अपघातात जीप डोंगराच्या कडेला जाऊन धडकली तर कार जागेवर फिरली. अपघातात काळीपिवळी जीपमधील अखिलाबी (खुलताबाद), वैशाली वाकळे (सरई), रेखा अव्हाड, मधुकर डोहीवाल, यश आव्हाड (वेरूळ), जीपचालक शेख लतीफ, स्वाती भालेराव, रोहन हजारे, असे आठ जण जखमी झाले. अपघात कारचा चुराड झाला.

अपघातात युवक ठार
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा -भराडी रोडवरील धामणी फाट्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता काळीपिवळी जीप व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तळणी येथील संतोष हनुमंता वाघ (२२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर काळीपिवळी चालक फरार झाला. दुचाकीचालक संतोष वाघ धडकेनंतर दहा फुटांपर्यंत फरपटत गेल्याने ठार झाला.