आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कडा ऑफिससमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कडा ऑफिससमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत रिजवान उल्लाह खान अमान उल्लाह खान (३५, रा. बायजीपुरा) यांचा बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. खान हे चितेगाव येथील औरंगाबाद इलेक्ट्रिकल कंपनीत नोकरीला होते. रात्रीची शिफ्ट संपल्यावर कंपनीच्या बसने ते गजानन महाराज मंदिराजवळ उतरले. तेथून घराकडे पायी जात असताना कडा ऑफिससमोर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सकाळी सातच्या सुमारास पोलिसांना मिळाली. मूळ वसमत येथील रिजवान उल्लाह खान नोकरीनिमित्त शहरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
जवाहरनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय एन. जी. पोमनाळकर करत आहेत. दरम्यान, त्यांच्या कंपनीतील राजपूत यांनी खान यांचा मृतदेह घाटीतून वसमतला रुग्णवाहिकेतून नेण्याची व्यवस्था केली.
बातम्या आणखी आहेत...