आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला रुग्णाला डॉक्टरच्या कारची धडक; पोलिसांनी चालकास घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घाटी रुग्णालयात पतीसह उपचारासाठी आलेल्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. विशेष म्हणजे कारचालक डॉक्टरच निघाला. हा अपघात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला. वैशाली मनोज गायकवाड (२९, रा. काजीवाडा) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पतीसह घाटीत आलेल्या वैशाली या ओपीडीत उपचार घेऊन घरी जाण्यासाठी बाहेर आल्या होत्या. 

दरम्यान त्यांची दुचाकी नो पार्किंगमध्ये लावली असल्याने ती वाहतूक कर्मचाऱ्यांनी उचलून नेली होती. दुचाकी शोधत असतानाच भरधाव आलेल्या कारने ( क्र. एमएच २० डी. व्ही ०२०४) त्यांना जोराची धडक दिली. त्यांचा पाय कारच्या समोरच्या चाकाखाली अडकला. अपघात झाल्याचे पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक कारचालकास कार मागे घेण्यास सांगत असतानाही त्याने लक्ष दिले नाही. त्याने कारच्या काचाही उघडण्यास नकार देत काचा उघडल्या नाही. संतप्त नागरिकांनी दम दिल्यानंतर त्याने कार मागे घेतली. दरम्यान घाटी चौकीतील पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले. तो घाटीतच डॉक्टर असल्याचे कळते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. 
बातम्या आणखी आहेत...