आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident Issue At Paithan Road, Aurangabad, Divya Marathi

दुचाकीच्या धडकेत सहा वर्षांच्या बालकाचा अंत, पैठण रोडवर पायी चलताना अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वडिलांसोबत पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीने धडक दिल्यामुळे दत्ता राजू फोले (6, रा. वाल्मी परिसर) या बालकाचा अंत झाला. ही घटना 18 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता पैठण रोडवरील धिल्लन रेसिडेन्सीसमोर घडली असून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

दत्ता वडिलांसोबत जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्याला धडक दिली. अपघातानंतर जखमी दत्ताला घाटीत दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. चिमुकल्याचा अंत झाल्याने वडिलांना धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी तीन दिवस पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मंगळवारी त्यांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. फोले हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगावजवळील सावरगावचे आहेत. सध्या ते कांचनवाडीतील वाल्मी गेटसमोर राहतात. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्याचे जमादार नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.