आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Accident Issue At Aurangabad, Divya Marathi

औरंगाबादमध्‍ये दोन अपघातांत दोघांचा अंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात शनिवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा करुण अंत झाला. वाळूज-औरंगाबाद महामार्गावर कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शेख अब्दुल रहीम शेख अहमद (22) याचा, तर जालना मार्गावरील चिकलठाणा जकात नाक्यासमोर झालेल्या अपघातात बाबासाहेब डोईफोडे (22) याचा मृत्यू झाला.
मुकुंदवाडी येथील रहिवासी शेख अब्दुल रहीम हा त्याच्या दुचाकीने (एमएच 20 सीई 9982) वाळूज-औरंगाबाद महामार्गावरून औरंगाबादकडे येत होता. मात्र अहमदनगरहून भरधाव वेगाने औरंगाबादकडे येणार्‍या कंटेनरने ( जीजे 18 एयू 8269) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात तो जागीच कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत छावणी पोलिसांनी त्याला रात्री दहा वाजता घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

छावणी ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फौजदार जी. एम. तडसे तपास करत आहेत. दुसरा अपघात जालना मार्गावरील चिकलठाणा जकात नाक्यासमोर झाला. शनिवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान बाबासाहेब डोईफोडे आणि भाऊसाहेब डांगे हे दुचाकीने औरंगाबाद तालुक्यातील आपत भालगावकडे जात होते. ट्रकने (एमएच 04 ईवाय 6449) त्यांच्या दुचाकीला (एमएच 21 एएफ 9060) समोरून धडक दिली. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात बाबासाहेब डोईफोडे (22, भालगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दुचाकीच्या मागे बसलेले भाऊसाहेब डांगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी सिडको ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक फौजदार मधुकर शिंदे यांच्याकडे तपास आहे