आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Divya Marathi, Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातांत तीन ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागद (कन्नड) - कन्नड तालुक्यातील नागदजवळील बेलखेडा येथे बस-दुचाकी अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता घडली. वाल्मीक मुरलीधर सोनवणे (२७) व भास्कर रामकिसन मोरे (३५) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही कन्नड तालुक्यातील उंबरखेड येथील रहिवासी होते.

सोयगाव आगाराची सिल्लोड- मालेगाव बस (एमएच २० डी ९९२६) ही मालेगावकडे जात होती, तर दुचाकी (एमएच २० एएन ६५१९) ही सोयगावकडे जात होती. बेलखेडाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार दोघे ठार झाले. मृतांचे श्वविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत नातेवाइकांना ताटकळत बसावे लागले होते. संतप्त झालेल्या नातेवाइकांना पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. या वेळी हेडकॉन्स्टेबल बी. डब्ल्यू. मोरे, आर. एस. शिंदे, एस. बी. गायके, ग्रामस्थ रामदास पाटील, गोकुळ चव्हाण आदींनी मदत केली.
वैजापूर | बस व दुचाकी धडकेत विंचूर येथील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी तालुक्यातील खंडाळा येथे घडली. परसराम रामनाथ शेळके (३४, िज. नािशक) असे मृताचे नाव आहे. विंचूर येथील परसराम शेळके हे आपला सहकारी नारायण पुंजाजी नागरे (३६, रा. डोंगरगाव) याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच१५ डीसी१०७७) खंडाळ्याकडे जात असताना समोरून येणा-या एसटीशी (एमएच २० बीएल १७८६) जोराची धडक झाली. या धडकेत परसराम याला गंभीर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला, तर दुचाकीवरील जखमी नारायण नागरे हा अपघात झाल्यावर मृत परसराम याला घटनास्थळी सोडून फरार झाला.