आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कंटेनरची दोन ट्रकला धडक, एक ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड शहराजवळील अंबाडी प्रकल्पाजवळील वळणावर भरधाव कंटेनरने दोन वाहनांना जोरात धडक दिल्याने एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. अपघातानंतर वाहने एकमेकांत अडकल्याने तसेच त्यातील जखमींना बाहेर काढण्यासाठी तीन तास लागल्याने महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.

अलीकडच्या काळात मृत्यूचा सापळा बनलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबाडी प्रकल्पाजवळील धोकादायक वळणावर दुचाकीचा वाहतूक करणारा कंटेनर( एचआर ३८ एम ६५०८) हा चाळीसगावहून औरंगाबादकडे वेगाने जात असताना पत्रे वाहतूक करणारा आयशर ( एमएच १७ के ८२८४) ट्रकला प्रथम जोरात धडक देऊन कंटेनर उलटला. आयशरच्या पाठीमागून येणा-या ट्रकमध्ये(आरजे १४ जीएफ ४१८६) तो वेगात घुसला. दोन्ही वाहनांच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालक व क्लीनरला बाहेर काढण्यासाठी पोिलस, प्रवासी व नागरिकांना तीन तास कसरत करावी लागली. जखमींना बाहेर काढताना वेळ लागल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दुस-याला गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्याला घाटीत दाखल करण्यात आले. दोघांची नावे व पत्ता कळू शकला नाही. इतर वाहनांतील जखमींमध्ये गणेश रमेश पवार(२४, रा. लासूर स्टेशन), अमीर अजीम खान (१०), कय्युम अब्दुल खान ( १८, दोघे हरियाणा) यांच्यावर कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

अपघातात आयशर ट्रकची उजवी बाजू पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. अपघाताची मािहती िमळताच पोिलस िनरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोिलस निरीक्षक पायघन, पोिलस उपनिरीक्षक अय्याज िसद्दिकी, संदीप कनकुट्टे, एस.पी. उबाळे, सुिजत राठोड, किरण गंडे, एम. व्ही. पवार यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. या वेळी अंधानेर येथील कचरू नेवगे व इतरांनी दोन जेसीबी घटनास्थळी आणून ट्रक बाजूला करण्यात शर्थीचे प्रयत्न केले.

ट्रक-कारमध्ये धडक, १ ठार
खुलताबाद-फुलंब्री मार्गावर ट्रक व कारमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. जखमींना घाटीत दाखल करण्यात आले आहे.
खुलताबाद-फुलंब्री मार्गावर सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास सराई गावाजवळ ट्रक (एचआर ४१५१) व कार (एमच एच ०१ डीए ३५७८) यांच्यात समोरासमोर धडक झाली.

या अपघातात कारचालक श्रावण बाबूलाल शर्मा (३०, बारामती) हा जागीच ठार झाला, तर कारमधील सुनील शर्मा (३५), सोनू कैलास शर्मा (२५) हे जखमी झाले आहेत. पोिलसांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.