आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चाहून परतणाऱ्या कारला ट्रकची धडक, त्यावर तिसरी कार धडकली; 4 ठार, 2 गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत बुधवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चात औरंगाबादचे तरुण व त्यांच्या मित्रांनी सेल्फी टिपली. ती तिघांसाठी बहुतेक शेवटचीच ठरली. - Divya Marathi
मुंबईत बुधवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चात औरंगाबादचे तरुण व त्यांच्या मित्रांनी सेल्फी टिपली. ती तिघांसाठी बहुतेक शेवटचीच ठरली.
येवला (जि. नाशिक)- नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी सकाळी ६.३० वाजता दुभाजक नसलेल्या रस्त्यावर ट्रकचालकाच्या चुकीमुळे ट्रक, ह्युंडाई व्हर्ना कार व मारुती ८०० कार असा तिहेरी अपघात झाला. यात मुंबईतील मराठा मोर्चाहून परतणाऱ्या औरंगाबादचे  दोघे, त्यांच्या पुण्यातील एक मित्र आणि दुसऱ्या कारमधील एकाचा मृत्यू झाला. दोन जखमींवर आैरंगाबादेत उपचार सुरू आहेत. ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.

खामगाव पाटी शिवारात मोर्चाहून औरंगाबादकडे परतत असलेली व्हर्ना कार (एमएच २० इएफ ७२६४) व येवल्याकडे येणाऱ्या मालट्रकची धडक झाली. त्याचवेळी मारुती कारही त्यांना धडकली. या भीषण अपघातात व्हर्नाचा चक्काचूर झाला. ट्रकचे पुढचे टायरही निखळून पडले. मारुती कारमधील वैभव गटकळ (२४, जि. नाशिक) यांचा मृत्यू, ५ जण जखमी झाले. अपघातस्थळी मोर्चाचे स्टिकर असलेल्या कापडी पट्ट्या विखुरलेल्या होत्या.

तिघे मृत एकुलते एक
मृतांपैकी तिघे तरुण एकुलते एक होते. हर्षल हा पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मोर्चानंतर मित्रांबरोबर तो औरंगाबाद येथे चालला होता. अविनाश गव्हाणे मोबाइल कंपनीच्या सिमकार्डचा वितरक होता. नारायण थोरात याचीही मोबाइल शॉपी होती. 

पुढील स्लाइड पाहा.. अपघातीची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...