आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident On Jalana Road, 2 Ambulance Present Immediately

पंधरा मिनिटांत दोन रुग्णवाहिकांना अपघात, सुदैवाने जीवित हानी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेसात ते पावणेआठदरम्यान दोन रुग्णवाहिका आणि दोन इनोव्हा कारला अपघात झाला. या अपघातांत रुग्णवाहिका कारवर आदळल्या. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. एक अपघात हा सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर एसएफएस, तर दुसरा अपघात हायकोर्टासमोर झाला.
सज्जुलाला मित्रमंडळाची रुग्णवाहिका (एमएच २२ एडी २२०७) सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरून रुग्ण घेऊन जात असताना एसएफएसजवळ इनोव्हा कार (एमएच २० डीजे ८२७५) अचानक थांबल्याने रुग्णवाहिका या कारवर आदळली. रुग्णवाहिकेत हुजरत खान नावाचा रुग्ण होता. अपघातानंतर रुग्णाला रिक्षाने अॅपेक्समध्ये नेण्यात आले. इनोव्हा कारमध्ये लहान मुले होती. त्यांना कुठलीही इजा झाली नाही. ही कार अर्जुन ठाकूर चालवत होत. दुसरा अपघात उच्च न्यायालयासमोर झाला. शेख युनूस हे इनोव्हा कारने (एमएच १४ बीसी ८१००) जात असताना समोरील वाहनचालकाने ब्रेक लावल्यामुळे युनूस यांनीही ब्रेक लावला असता मागून आलेली रुग्णवाहिका (एमएच २० बीटी ३९३३) कारवर आदळली. याच वेळी एका वाहनाचा धक्का बायजीपुरा येथे राहणारे शेख कय्युम यांच्या दुचाकीला बसला. या अपघातांमुळे दोन्ही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.