आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अपघातांत दोघांचा अंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - अवैध वाहतुकीचा आणखी एक बळी सोमवारी गेला. प्रवाशांनी खचाखच भरलेली अँपेरिक्षा आणि स्कॉर्पिओच्या धडकेत दादाराव औचरमल (35, रा. जोगेश्वरी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर आयटीआयच्या दोन विद्यार्थिनींसह सहा जण जखमी झाले. दुसर्‍या अपघातात खासगी आराम बस खड्डय़ात उलटल्याने रत्नाबाई पोहरे (60, रा. रिसोड, वाशीम) ठार झाल्या असून 20 प्रवासी जखमी झाले.

सकाळी आठच्या सुमारास अँपेरिक्षा (एमएच 20 एए 4103) पंढरपूरहून औरंगाबादकडे जात होती. नवीन मुंबई महामार्गावरील चौकात आल्यानंतर औरंगाबादकडून भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने (एमएच 20 बीसी 1901) वैजापूरकडे जाण्यासाठी वळण घेतले. त्यामुळे दोन्ही वाहनांची धडक झाली. यात अँपेरिक्षातील दादाराव जागीच ठार झाले व मनीषा बर्वे (21),जयर्शी केदारे (19), विलास केदारे (50) चंदू नंदिले (43), जयर्शी कुंटे (45) जखमी झाल्या. त्यांना स्कॉर्पिओतूनच घाटीत हलवण्यात आले. अँपेचालक गणेश कारभारी बुट्टेवर (27) खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारचालक चैनसिंग कांकरवाळ (30) याला अटक केली.

नागपूरच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सची आराम बस (एमएच 34 ए 8372) पुणे येथून वाशीमकडे जात होती. सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास इसारवाडी फाट्यासमोर या बसला एका ट्रकने हूल दिली. त्यामुळे चालक प्रवीण तळेकर याचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावरून उतरून एका खड्डय़ात उलटली. या अपघातात रत्नाबाई नारायण पोहरे या जागीच ठार झाल्या, तर 20 प्रवासी जखमी झाले. यात अनेकांची डोकी फुटली.

आयटीआयच्या विद्यार्थिनींची परीक्षा हुकली
वाळूजमधील मनीषा बर्वे आणि जयर्शी केदारे या शहरात शिक्षणासाठी येतात. सोमवारी त्यांची पॅ्रक्टिकल परीक्षा होती. या अपघातात दोघीही जखमी झाल्या आहेत. त्या आयटीआयमध्ये बिंल्डिंग कन्स्ट्रशनचा डिप्लोमा करीत आहेत.