आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूच्या पाशातून बचावले ३२ प्रवासी, चालकाने ब्रेक नादुरुस्त असल्याची केली होती तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती/चांदुरबाजार- घाटलाडकीयेथून सोनोरीमार्गे चांदुरबाजारकडे जाणा-या एसटी बसचे गुरुवारी एका वळणावर ब्रेक लागल्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात वाहक-चालकासह ३२ प्रवासी जखमी झाले. सकाळची वेळ असल्यामुळे या बसमध्ये बहुतांश शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चांदुरबाजार आगाराची बस (क्रमांक एमएच ४० -९८९२) घाटलाडकीवरून सोनोरी-नानोरी मार्गे विद्यार्थी, प्रवाशांना घेऊन चांदुरबाजारकडे येत होती. सोनोरीपासून काही अंतरावर आल्यावर एका वळणावर बसचे मागचे चाक खड्ड्यात गेले. चालकाने ब्रेक मारले मात्र ते लागले नाहीत. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले. वाहकाच्या बाजूने बसला धडक बसल्याने ५५ प्रवाशांपैकी ३२ जणांना दुखापत झाली. चालकाच्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली. दुर्घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी चांदुरबाजार ग्रामीण रुग्णालयामध्ये तेथून अमरावतीला हलवण्यात आले. बसफेरी शाळेच्या वेळातील असल्यामुळे जखमींमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चांदुर बाजार येथील नगर परिषद विद्यालय, गो. सी. टोम्पे अध्यापक विद्यालय यांसह अन्य शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी या वेळी बसमध्ये होते. माहिती प्राप्त होताच एसटी महामंडळाचे अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले होते.
ब्रेकरोलबाबत तक्रार नोंदवली होती : बसमधीलब्रेक रोल नादुरुस्त असून, बस चालवण्याच्या स्थितीत नसल्याची तक्रार आगारातील यंत्रणेला काही दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. गुरुवारी ही बस घेऊन जाण्यासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. मात्र, दबावामुळे फेरी घेऊन गेलो. ही बस प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नसल्याचे जखमी चालक शे. नरुल्ला यांनी सांगितले.
शेख नुरुल्ला शे. खैरुल्ला (३५, रा. अमरावती, बसचालक), अशोक रामकृष्ण लोहकरे (५५, रा. कठोरा नाका, अमरावती, बसवाहक), विजय संजय वानखडे (१७), अ. समद शे. मुस्ताक (३५), शंकर इसाजी वानखडे( तिघेही रा. घाटलाडकी), समीक्षा राठोड (१९, परसोडा), जोगीलाल दत्तुसिंग राठोड (परसोडा, ७०), शरद पांडुरंग खोब्रागडे (३४, कुरणखेड), गायत्री प्रकाश फुले (१३, वणी बेलखेडा), विठ्ठल वामनराव तायवाडे (६५, घाटलाडकी), अजय थोरात, महादेव मोहोड (कुरणखेड), राजाराम चंद्र शितकारे (५०), मनोहर हिरडे (५४), विभा शिवराम धाडसे (७०), विठुबाई धाडसे (६५), शुभम कुरवाडे (१५), नीलेश राजस (१४), गणेश वानखडे (१६), चेतन नरगवे, पल्लवी शेळके (१३), शे. अन्वर शे. मुनीर, योगेश पाटील (१८), प्रफुल्ल राजस, संतोष पोहकर, कैलास धुर्वे (३३), श्यामला मोहोड (१३), अनुजा शेळके (१३, वणी), सौरभ राजस (१७), नितीन टेकाडे, शे. मन्वर शे. मुनीर, अमोल गोंडाने, मो. मुजाबिल अ. रज्जाक यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
जखमींना तत्काळ आर्थिक मदत
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अमरावती आगार व्यवस्थापक नीलेश बेलसरेंसह अधिका-यानी जखमींना प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत केली. पुढील उपचारासाठीसुद्धा खर्च करण्यास महामंडळ वचनबद्ध आहे. नीलेशबेलसरे, आगारव्यवस्थापक.