आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातांत युवती, व्यापा-याचा अंत, स्वातंत्र्यदिनी घडल्या दोन वेगवेगळ्या घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांना जीव गमवावा लागला. ज्योतीनगर येथील रहिवासी अनुजा शरद राजहंस (१८) आणि सागर हनुमानदास भंडारी (३६, रा. नाथनगर, सिंग कॉलनी) या आडत व्यापाऱ्याचा मृतांमध्ये समावेश आहे. अनुजा शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता स्कूटीवर रिलायन्स मॉलसमोरून जात होती. रामगोपालनगर येथील नातेवाइक सागर रत्नाकर शेळके हा तरुण गाडी चालवत होता, तर अनुजा पाठीमागे बसली होती. स्कूटीला मागून आलेल्या ट्रकने (एमएच २६ ७५६५) जोरदार धडक दिली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. अनुजाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला उपचारासाठी माणिक हॉिस्पटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री ७.३० वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सागरलाही किरकोळ दुखापत झाली असून त्याच्या फिर्यादीनुसार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा (३०४-अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक माणिक चौधरी यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.
अर्धवेळ करायची नोकरी
शरद राजहंस यांना दोन मुली असून त्यापैकी अनुजा ही लहान, तर श्रद्धा ही मोठी बहीण आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोघी बहिणी भारतीय जनता पक्षाच्या वॉर रूममध्ये अर्धवेळ नोकरी करायच्या. अनुजा सध्या देवगिरी महाविद्यालयात बीकॉम प्रथम वर्षाचे िशक्षण घेत होती, तर श्रद्धाने नुकतेच बीएडचे िशक्षण पूर्ण केले आहे. शनिवारी प्रतापनगर स्मशानभूमीत अनुजावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास क्रांती चौक उड्डाणपुलावरून जाताना बुलेटस्वार (दुचाकी) आडत व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. सागर हनुमानदास भंडारी (३६, रा. नाथनगर) असे त्यांचे नाव आहे. अमरप्रीत हॉटेलमार्गे बाबा पेट्रोल पंपाकडे (महावीर चौक) जाताना बुलेट क्रमांक एमएच २० डीएच २५० अचानक स्लिप झाली. त्यामुळे भंडारी पुलावर कोसळले. त्यांना जखमी अवस्थेत डॉ. दुनाखे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे शनिवारी (१६ ऑगस्ट) १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस नाईक के. एस. काकडे तपास करत आहेत.