आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accounts Seal Of Aurangabad Municipal Corporation

मनपाची खाती सील केल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वांधे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पीएफ कार्यालयाने दोन महत्त्वाची बँक खाती सील करूनही महानगरपालिकेने थकीत रक्कम भरल्याने आता कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वांधे होण्याची वेळ आली आहे. लेखा विभाग कामगार विभागातील अधिकाऱ्यांमधील वितुष्टामुळे खात्यांचे सील काढण्याबाबत कार्यवाही होण्यास विलंब लागत आहे.
महापालिकेने काही भागांत साफसफाईचे काम बचत गटांना दिले आहे. २००९ पर्यंत या बचत गटांच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पीएफची जबाबदारी मनपाकडेच होती. नंतर संबंधित बचत गटांना सूचना देऊन स्वतंत्र पीएफ क्रमांक घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार नंतर प्रक्रिया सुरू झाली. पण ही जबाबदारी मनपाकडे असताना आॅगस्ट २००८ ते जून २००९ या अकरा महिन्यांच्या कालावधीत ३०० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांचा पीएफ मनपाने कापून घेतला पण तो पीएफ कार्यालयात जमाच केला नाही. नंतरच्या काळात याबाबत तक्रारी आल्या. त्यानुसार पीएफ कार्यालयाने चौकशी केल्यानंतर पीएफ आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणात मनपाला त्या अकरा महिन्यांचा थकलेला २१ लाख ९२२ रुपयांचा पीएफ तातडीने भरण्याचे आदेश दिले.
त्यासाठी पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. पण मनपाने काहीच केल्याने अखेर पीएफ कार्यालयाने मनपाची एचडीएफसी आयडीबीआय बँकेतील दोन्ही खाती सील केली.
ही कारवाई करून दोन दिवस उलटले तरी महापालिकेकडून काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. याबाबत माहिती घेतली असता कामगार विभाग लेखा विभागातील अधिकाऱ्यांचे पटत नसल्याने याबाबत दोघेही एकमेकांना सहकार्य करायला तयार नाहीत जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत.
कारभार ठप्प : मनपाची सहा बँक खाती आहेत. त्यापैकी आयडीबीआय एचडीएफसी बँकेतील खाती महत्त्वाची आहेत. एलबीटी, करभरणा यांचे उत्पन्न त्यात जाते. शिवाय कर्मचाऱ्यांचे पगार बिलांचा काही भाग या खात्यांच्या माध्यमातून दिला जातो. ही दोन्ही खाती दोन दिवसांपासून पूर्णतया ठप्प आहेत. आता मनपा कर्मचाऱ्यांचे पगार जवळ आले असतानाच ही खाती सील केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.