आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप सिद्ध होताच आरोपीचा फिल्मी ड्रामा; लघुशंकेचे नाटक करून न्यायालयातून झाला पसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लघुशंकेचे निमित्त करून आरोपी न्यायालयातून फरार झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात घडली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. राजे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सांडू हरी चव्हाण (५९) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने पकड वाॅरंट बजावले आहे.
 
निसर्गनगर परिसरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सांडवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, आरोपीला जामीनही मंजूर झाला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर सुरू होती. ती सुनावणी अंतिम टप्प्यात असल्यामुळे सांडूही न्यायालयात हजर होता. त्याच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात आला. सहायक सरकारी वकील ए. पी. बागूल यांनी युक्तिवाद केला. 

शिक्षा सुनावणार असल्याचे लक्षात येताच आरोपीने लघुशंकेसाठी जाण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने तातडीने परवानगी दिली. मात्र, १५ मिनिटे झाली तरी तो हजर झाल्याने त्याचा शोध घेण्याचा छावणी पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, आरोपी सापडला नाही. ही बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली. न्यायालयाने आरोपीविरोधात पकड वाॅरंट जारी केले. 
बातम्या आणखी आहेत...