आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीचा न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीच्या खुनाची शिक्षा ऐकताच ब्लेडने केले वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. साक्ष-पुराव्यांवरून गुन्हा सिद्ध झाला आणि आरोपीला शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) न्यायालयाने जन्मठेप सुनावली. ही शिक्षा ऐकताच आरोपीने सोबत आणलेल्या ब्लेडने भर न्यायालयात स्वतःच्या गळ्यावर सपासप वार केले. जिल्हा कोर्टातील तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांच्यासमोर शुक्रवारी दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आणि पोलिसांनी जखमी आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर आत्महत्येचाही गुन्हा नोंदवला.
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी मुकेश विश्वनाथ चौधरी (रा. शिगाईत, ता. जामनेर, जि. जळगाव) याला तत्काळ ताब्यात घेतले आणि घडल्या प्रकाराबद्दल वेदांतनगर चौकीच्या पोलिसांना कळवण्यात आले. आरोपी एका कंपनीत नोकरीस होता. तो सहकुटुंब नक्षत्रवाडीतील कांचननगरमध्ये भाड्याने राहत हाेता.

घटनेच्या दिवशी म्हणजे १५ मार्च २०१० रोजी आरोपी मुकेश त्याची पत्नी माधुरी हिला संध्याकाळी सहा वाजता फिरायला घेऊन गेला होता. मात्र, रात्री आठ वाजता तो एकटाच परतला. घरात मागच्या बाजूने घुसल्याचे घरमालकासह शेजारच्यांनी त्याला पाहिले. त्याचे कपडे रक्ताने माखलेल्या होते. घरमालकाने त्याला बघताच त्याने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले होते. त्याला घाटीत नेले असता डॉक्टरांनी तपासून तो ठणठणीत असल्याचे सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...