आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'acha Aadmi' Complaint Against The Commission Issue At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अच्छा आदमी’ विरोधात आयोगाकडे तक्रार, दिशाभूल असल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांंनी "अच्छा आदमी'च्या नावाखाली जनतेची दिशाभूल चालवली असून टीम औरंगाबादच्या नावाखाली त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार मिसारवाडी येथील जवाहरलाल भगुरे यांनी आयोगाकडे केली आहे.

गेल्या काही दविसांपासून शहरात अच्छा आदमी असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. काही ठिकाणी टीम औरंगाबादमार्फत दर्डा यांचा प्रचार करण्यात येत आहे. यात आदर्श आचारसंहितेचा भंग होत असून आयोगाने कारवाई करून जनतेची दिशाभूल रोखावी, असे भगुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. सोशल मीडियावर टीम औरंगाबादच्या नावाने दर्डा यांची जाहिरात करण्यात येत आहे. ते त्वरित थांबवावे आणि जनतेची दिशाभूल केली म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे आचारसंहिता कक्षप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी म्हटले आहे.