आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- महिला कॉन्स्टेबलवरील लैंगिक अत्याचाराची गंभीर दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (अठरावे) वैशाली पाटील यांनी दोन सहायक पोलिस आयुक्तांवर बलात्काराचा, तर एका एसीपीवर विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज (16 जानेवारी) दिले. बलात्काराचा आरोप असलेल्या दोघांवर अटक वॉरंट, तर एकावर समन्स बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.
शहर पोलिस दलातील महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याची तक्रार स्वत: पीडित कर्मचार्याने पोलिसांत केल्यानंतरही काहीही कारवाई झाली नाही, अशा आशयाची फौजदारी तक्रार पीडित महिलेने न्यायालयाकडे केली होती. याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी प्रथम दर्शनी गुन्हा नोंदवून घेतला असून सहायक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे आणि किशन बहुरे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 376 अन्वये बलात्काराचा, तर नरेश मेघराजानी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. भाजीभाकरे आणि बहुरे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.
प्रथमदर्शनी हे प्रकरण गंभीर असल्याने प्रथम न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी गुन्हा करीत आणि वॉरंट काढण्याचे आदेश दिल्याची माहिती पीडित महिलेचे वकील नईम शेख आणि सचिन थोरात यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. भाजीभाकरे आणि बहुरे यांना संबंधित पोलिसांना अटक करून न्यायालयासमोर हजर करावे लागणार आहे. दुसरीकडे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्या आदेशाने पोलिस उपायुक्त डॉ.जय जाधव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. शिवाय फॅक्स प्रकरणात त्यांनी दोन दुकानमालकांची ओळख परेड केली आहे. 4 आणि 9 जानेवारी रोजी पंतप्रधान, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे सचिव यांना फॅक्स करून दया मरणाचे अर्ज पाठवले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.