आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षे छदामही देणाऱ्यांनी अर्ध्या तासात दिले लाख, कोर्टाच्या आदेशाने कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रखर विरोध होऊनही मनपाच्या मालकीच्या ३०० गाळ्यांना सील करण्याची मोहीम गुरुवारपासून सुरू केली. पहिल्या दिवशी सब्जीमंडी भागातील आठ दुकानांना कुलूप लावण्यात आले. बारा वर्षांपासून भाडे थकवणाऱ्या दोन व्यापाऱ्यांनी मोहीम सुरू होताच अर्ध्या तासात दोन लाख पाच हजार रुपयांचा भरणाही केला. शुक्रवारपासून मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. 

मनपाच्या २६ व्यापारी संकुलात ४९६ गाळे (दुकाने) असून त्यातील 300 गाळेधारकांचा भाडे करार २००४ मध्ये संपला. नंतर त्यांनी भाडे आकारणी योग्य झाली नाही, असे म्हणत नवा करार केलाच नाही. काही व्यापारी वाढीव दराने रक्कम भरण्यास तयार असताना अधिकाऱ्यांनी प्रकरण वरिष्ठ स्तरावर आहे, असे सांगत भाडे भरून घेतले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येकी तीन लाख रुपये थकले. 

त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिल्यावर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. तेव्हा ३०० गाळे सील करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार सब्जीमंडी (राॅक्सी चित्रपटगृहाजवळ) येथील ३८ गाळेधारकांविरुद्ध मोहीम सुरू झाली. एशियन पेंट, विजय आणि क्रांती सायकल मार्टला तसेच लगतच्या पाच दुकानांनाही सील केले. ते पाहून एका व्यापाऱ्याने ७५ तर दुसऱ्याने एक लाख तीस हजार रुपयांचा भरणा केला. मनपा आयुक्त दीपक मुगळीकर, अतिरिक्त आयुक्त भालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या नेतृत्वात मालमत्ता अधिकारी वामन कांबळे, शेख अहेमद शफी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

३०० गाळेधारकांवर होणार कारवाई
‘२१आॅगस्टपर्यंत न्यायालयाला अहवाल द्यायचा आहे. म्हणून तीन पथके स्थापन करून १०० गाळ्यांना सील करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पण कारवाई ३०० गाळेधारकांवर होणार आहेच, असे मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले. 

५०% भरा, कारवाई टाळा 
दुकानदारांनीथकबाकीच्या५० टक्के रक्कम भरल्यास कारवाई टळू शकते. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी ही रक्कम भरावी. -हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता 

शिवीगाळ, धमकावले 
काहीव्यापाऱ्यांनी पथकाला शिवीगाळ करत धमकावले. विजय, क्रांती सायकल मार्टचे मालक विजय देशमुख यांनी पथकाला अर्धा तास रोखले होते. मी दुकानातच बसून राहणार, असे ते म्हणत होते. पथकाने दुकानाच्या मागील बाजूच्या दरवाजाला कुलूप लावले. तेव्हा ते बाहेर पडले.
बातम्या आणखी आहेत...