औरंगाबाद - शेतकर्यांना बोगस बियाण्यांचा पुरवठा करणे ही गंभीर बाब आहे. असा प्रकार घडत असेल तर बोगस िबयाण्यांचा पुरवठा करणार्या व्यापार्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना जामीनही मिळणार नाही अशी कलमे पोलिसांना टाकायला लावू, असा इशारा पालकमंत्री रामदास कदम यांनी खरीप आढावा बैठकीत दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी ही बैठक झाली.
या वेळी जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आमदार प्रशांत बंब, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार संदिपान भुमरे, अतुल सावे, संजय शिरसाट यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी सहा लाख ५२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षी ६७५ मिमी अपेक्षित पावसाची सरासरी असताना केवळ ४०८ मिमी (६० टक्के) इतकाच पाऊस झाला.
या वर्षीच्या खरिपाच्या पेरणीत ज्वारी हजार हेक्टर, बाजरी ३५ हजार हेक्टर, मका एक लाख ७० हजार हेक्टर इतर तृणधान्य ५०० हेक्टर असे दोन लाख ८५ हजार हेक्टर तृणधान्यासाठी क्षेत्र प्रस्तावित आहे. तर तूर, मूग, उडीद ४७ हजार ५०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. तर भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन या तेलबियांचे एकूण क्षेत्र १९,६०० हेक्टर आहे. तर कापसाचे पेरणी क्षेत्र लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. तर जिल्ह्यासाठी लाख ९२ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता आहे. त्यापैकी लाख ३५ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन मजूर असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक बी. डी. लोणारे यांनी सांगितले.
खड्ड्यांबाबत माहिती घेतली
महापौरत्र्यंबक तुपे यांनी विहिरींचा गाळ काढण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर मनपाने प्रत्येक गोष्टीसाठी निधी मागू नये, असे पालकमंत्री म्हणाले. मनपाने उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. आगामी काळात औरंगाबाद मनपा उत्पनाच्या स्रोताच्या बाबतीत सक्षम झाली पाहिजे हा संदेश गेला पाहिजे, असे ते म्हणाले. रस्त्याच्या खड्ड्याच्या संदर्भात स्थिती काय आहे याबाबतची माहिती द्या त्यासाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे
बैठकीच्यासुरुवातीलाच कदम यांनी शेतकर्यांच्या आत्महत्या हा कलंक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शेतकर्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत वेगळी बैठक घेणार आहे. शेतकर्यांना वेळेवर बी-बियाणे, खते मिळाली पाहिजेत. त्यासाठी त्यांना रांगा लावणे, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याची वेळ येऊ देऊ नये. जिल्ह्यातील आत्महत्या थांबवून मराठवाड्यात तसेच राज्यात
आपण संदेश देऊ. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे बोगस बियाण्यांच्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. या वेळी बंब यांनी खतासाठी लासूर स्टेशनवर बफर स्टॉक करण्याची मागणी केली.
पुढे वाचा, बैठक सोडून फोनवर गप्पा; कदमांनी आयुक्तांना झापले