आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळालगतच्या १५० घरांवर कारवाई होणार, शुक्रवारी मार्किंग!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणाविमानतळावर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी विमानतळाच्या विस्तारीकरणाआधी सध्याच्या विमानतळाच्या भिंतीला खेटून उभारण्यात आलेल्या १०० ते १५० इमारतींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी तेथे मार्किंगचे काम हाती घेण्यात येणार असून त्यानंतर पाडण्यायोग्य इमारतींना नोटीस देऊन कारवाई करण्यात येईल.

आगामी डीएमआयसी प्रकल्प सुरू होण्याअाधीच चिकलठाणा विमानतळावरून मालवाहतूक अर्थात कार्गो सेवा सुरू करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा पुढचा टप्पा राहणार असला तरी सद्य:स्थितीत विमानतळाबाबतीत अनेक अडचणी आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आज विमानतळ प्राधिकरणााचे अधिकारी, मनपा आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त यांची एक बैठक झाली. या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आपल्यासमोरील अडचणी मांडल्या. त्यातील अनेक अडचणी या महापालिकेशी संबंधित आहेत. विमानतळाच्या धावपट्टीवर जनावरे कुत्र्यांचा वावर कायम असल्याने विमानांना उतरताना उड्डाण घेताना अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय या परिसरातील अवैध मांसविक्री करणारे व्यावसायिक आपला कचरा विमानतळाच्या भिंतीलगत टाकतात. या मांस, कातडीच्या कचऱ्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढली असून त्यामुळे विमान अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, अशा तक्रारी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केल्या.

याबाबत अतिक्रमण हटावविरोधी पथकाचे शिवाजी झनझन यांनी सांगितले की, विमानतळाच्या भिंतीलगत १०० ते १५० घरे बांधण्यात आली आहेत. या भागात येत्या तीन दिवसांत मार्किंगचे काम हाती घेण्यात येणार असून मार्किंगदरम्यान धोकादायक आढळणाऱ्या इमारतींवर कारवाई करण्याबाबत नोटिसा देऊन लगेच कारवाई हाती घेण्यात येणार आहे.

भितींवर अतिक्रमण
याशिवायसर्वात गंभीर तक्रार होती ती विमानतळाच्या पश्चिमेकडील भागात चक्क विमानतळाच्या भिंतीवरच बांधकाम झाले असून या भागात चक्क घरे बांधण्यात येत आहेत. ही बाब धोकादायक असून यामुळे कायदा सुव्यवस्था विमानांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आजच्या चर्चेत समोर आले. याबाबत मनपाने कठोर कारवाई करण्याची तयारी दाखवली आहे.
बातम्या आणखी आहेत...