आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Action For Fertilizer Seller At Sillod To Agriculture Officer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी विभागाची बियाणे विक्रेत्यावर कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड: जास्त दराने बियाणे विक्री करणार्‍या बलदेवदास बीज भांडारवर कृषी व वजन मापे विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली.
शहरातील सराफा बाजारपेठेतील बलदेवदास बीज भांडारवर बीटी कॉटन बियाणांची चढय़ा दराने विक्री केली जात होती. तालुका कृषी अधिकारी उदय देवळाणकर, वजन मापे निरीक्षक आर. डी. जाधव व कृषी विस्तार अधिकारी संजीव मुसने यांनी नकली ग्राहक संध्याकाळी दुकानात पाठवला. त्याच्याजवळ खुणा करून काही नोटा देण्यात आल्या होत्या. दुकानदाराने जास्त किंमतीने बियाणे दिल्यानंतर अधिकार्‍यांनी छापा टाकून नोटासह बियाणे जप्त केले.
या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून परवाना रद्द करण्याची शिफारस जिल्हा परिषदेकडे करणार असल्याचे कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले. बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचा फास या मथळ्याखाली दिव्य मराठीमध्ये चार जुनच्या अंकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. यात कृषी विभाग कारवाईचा देखावा करत असल्याने शेतकर्‍यांचा तोटा होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. महसूल व वजनमापे विभाग नामानिराळा रोहात असल्याचेही या वृत्तात म्हटले होते. त्यानंतर कृषी विभाग व वजनमापे विभागाने ही कारवाई केली.