आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ, दादा आणि नानांना ठाण्यात बोलावून त्यांच्यावर कारवाई करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-वाहनांवर नियमबाह्य नंबरप्लेट लावून फिरणा-या शहरातील भाऊ, दादा, नाना आणि सरांना ठाण्यात बोलवा. या तथाकथित नेत्यांवर कडक कारवाई करा, असे स्पष्ट आदेश शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजित बो-हाडे यांनी पोलिस निरीक्षकांना आज दिले. दुसरीकडे वाहतुकीच्या नियमांचा भंग करणा-या वाहनांबाबत व नंबरबाबत थेट 9604436789 या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्स अ‍ॅपवर माहिती पाठवा, असे आवाहनही त्यांन जनतेला केले आहे.
शहरात सर्वसामान्य वाहनधारकांनी जर नियम मोडला तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो, तर दुसरीकडे चित्रविचित्र नंबर प्लेट लावून फिरणा-या बड्यांच्या चारचाकींना मात्र अभय दिले जाते. ही तथाकथित नेतेमंडळी नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशा फुशारकीत वावरत असतात. पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांचा सर्वत्र संचार असतो. हे स्वयंघोषित पुढारी पोलिसांना दाद देत नसल्याचेच चित्र पाहायला मिळते. यावर डीबी स्टारने सातत्याने आवाज उठवला आहे. सोमवार, 9 जून रोजी नाहीत.
‘पोलिसांची ‘नंबरी’ कारवाई’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजित बो-हाडे यांनी या भाऊ-दादा-नानांची नाकेबंदी करण्याचे आदेश काढले. त्यांनी वृत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या नंबरप्लेटच्या वाहनधारकांना ठाण्यात बोलवा व त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. शिवाय व्हॉट्स अ‍ॅपवरही नियमांचा भंग करणा-या वाहनधारकांची माहिती पाठवण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्यासाठी त्यांनी 9604436789 हा मोबाइल क्रमांकही दिला आहे.