आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समांतर’ची कारवाई 7 दिवसांनंतर, पाणीपट्टी दरवाढीचा फायदा मनपालाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर चाकरार रद्द करण्याची अंतिम नाेटीस देणे आता सात सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडले अाहे. बँक गॅरंटी संदर्भातील कंपनीने केलेल्या याचिकेवर सात तारखेला निकाल अपेक्षित असून त्यानंतरच मनपा समांतरला नारळ दिला जाणार आहे. वर्षभराच्या वादंगानंतर अखेर ३० जून रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेने समांतरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या अनुषंगाने मनपाने कंपनीला करार रद्द करण्याबाबतची महिनाभराची मुदत असलेली नोटीस बजावली होती. या नोटिशीला कंपनीने निर्धारित कालावधीत उत्तर दिले, पण त्या आधीच कंपनीने न्यायालयात जात बँक गॅरंटी जप्त करू नये एकतर्फी कारवाई करू नये, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली तसा स्थगनादेश मिळवला. या याचिकेवर काल निकाल अपेक्षित होता. पण तो आता सात सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे कंपनीला शेवटचा करार रद्द करण्यात आल्याचा नारळ देण्याचा मनपाचा मनसुबा लांबणीवर पडला आहे.

कंपनीचे दावे : तिकडे हे प्रकरण अंतिम टप्प्यात येत असताना कंपनीनेही आपल्या बाजूने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागच्या दोन महिन्यांत कंपनीने आलेल्या ५७ पैकी ४४ तक्रारी सोडवल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर मागच्या २२ महिन्यांत कंपनीकडे काॅलसेंटरच्या माध्यमातून १९ हजार तक्रारी आल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे कंपनीकडून आलेल्या तक्रारी ७२ तास ते १५ दिवस या काळात सोडवण्यात येत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेत पाणीपट्टीचा विषय निघताच कंपनीने निवेदन जारी करत दरवाढीचा फायदा मनपालाच फायदा असल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...