आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीएची तयारी करून घेणा-या महाविद्यालयांना प्राधान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची शहरातील विविध महाविद्यालयांत झुंबड दिसून येत आहे. यात प्रामुख्याने कोणत्या महाविद्यालयांत सीए, सीपीटीची तयारी करून घेतली जाते, याची माहिती घेतली जात आहे. जेथे अशा सुविधा आहेत, त्या महाविद्यालयांना विद्यार्थी प्राधान्य देत आहेत.दहावीचा निकाल लागल्यानंतर 11 वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची शहरातील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालयासह अनेक महाविद्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांचे माहितीपत्रक घेण्याबरोबरच कोणते विषय पुढील करिअरसाठी योग्य ठरतील याबाबत ते चौकशी करताना दिसत आहेत.शहरातील काही महाविद्यालयांनी सीए, सीपीटी (उङ्मेङ्मल्ल ढ१ङ्मा्रू्रील्लू८ ळी२३) परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी विशेष कोचिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये ही सुविधा आहे. यासाठी 28 ते 35 हजार रुपयांपर्यंत फी आकारली जात आहे. या कोचिंगशिवाय मुलींसाठी 285 तर मुलांसाठी 525 रुपये शुल्क आकारले जाईल.

आयटीआयला पसंती
या वर्षी आयटीआयमधील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती मिळते आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार आयटीआयच्या जागा आहेत. यात विद्यार्थ्यांना 28 प्रकारच्या ट्रेडचे प्रशिक्षण घेता येऊ शकते. यात प्रोडक्शन, मोबाइल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल अशा एक आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्राला कुशल कामगारांची गरज असल्यामुळे आयटीआयमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार
मिळेल, असा विश्वास प्राचार्य गणेश दंडे यांनी व्यक्त केला आहे.