आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच, ग्रामसेवकांवर आता होणार कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- ग्रामनिधीतून विंधन विहिरी घेता स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे महालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच तत्कालीन ग्रामसेवक यांनी अनियमितता केल्याचे उघड झाले आहे. या दोघांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला आहे.

तालुक्यातील मोठे गाव असलेल्या महालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष काळे तत्कालीन ग्रामसेवक वसंत इंगळे यांनी जून २०१६ मध्ये ग्रामनिधीतून विंधन विहीर घेऊन त्यात विद्युतपंप बसवल्याचे दाखवत एक लाख १० हजार रुपयांची रक्कम काढली होती. मात्र गावात कोठेच विंधन विहीर घेतलेली नसल्याने अन्य सदस्य साईनाथ आहेर, योगेश हुमे, कुसुमबाई आल्हाट मीना नजन यांनी याबाबत तक्रार केली होती. या सदस्यांनी जिल्हा परिषदेतून माहिती काढली असता ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या मोजमाप पुस्तिकेनुसार गावालगतच्या बसस्थानकाशेजारी असलेल्या तलावाच्या उत्तर बाजूला विंधन विहीर घेतल्याचे दाखवले होते. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी विंधन विहिरीच घेतलेली नाही. याबाबत पंचायत समितीने पंचनामा केला होता. मात्र त्यानंतर सरपंच ग्रामसेवकाने चौदा मैल या परिसरात विंधन विहीर घेतल्याचे दाखवले होते. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत या ठिकाणी विंधन विहीर घेण्यासाठी भूवैज्ञानिकांनी दिलेला स्थलदर्शक नकाशा तांत्रिक मान्यतेवरील तारीख एकच होती. विंधन विहीर विद्युत पंप खरेदीसाठी जून रोजी धनादेश दिले. मात्र २० एप्रिलच्या मासिक सभेत खर्चास मान्यता कशी घेतली २० एप्रिल रोजीची तांत्रिक मान्यता असताना त्यापूर्वी मार्चमध्येच त्यांनी विंधन विहीर घेतली. ज्या ठिकाणी विंधन विहीर घेण्यात आल्याचे दाखवले ती जागा संपादित क्षेत्रात असल्याने सिंचन खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.
या दोघांना ३० जून रोजी कारणे दाखवा नोटिसा दिल्यावर कॅशबुक लिहिण्यात आल्याचा ठपका ठेवत या सर्व प्रकरणात सरपंच संतोष काळे ग्रामसेवक वसंत इंगळे हे दोघे दोषी आढळून आले. या अहवालानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष काळे ग्रामसेवक वसंत इंगळे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
बातम्या आणखी आहेत...