आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात नाकेबंदी; नियम डावलणाऱ्यांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सध्या कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पॉईंटवर नाकेबंदी केली जात आहे. मंगळवारी रात्री शिवाजीनगर, बीडबायपास, बाबा पेट्रोल पंप, रेल्वेस्टेशन, शाहनूर मियाँ दर्गा परिसरात जड वाहने तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम दररोज सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरात येणाऱ्या ट्रक इतर जड वाहनांना बंदी आहे. पण या नियमाला डावलून रात्रीच्या वेळी जड वाहने शहरात आणली जातात. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. ही बाब लक्षात घेत विविध पॉइंटवर वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. ट्रक शहराबाहेर लाऊन चारचाकी लोडिंग वाहनातून सामान शहरात आणावे, असा नियम करण्यात आला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात केले जात आहे. त्यामुळी ही मोहीम तीव्र करण्यात आली.
"नोएंट्री' बोर्डाची आवश्यकता
पोलिस आयुक्तांनी केलेल्या नवीन नियमांचे शहरातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र शहरात येताना कुठेही ‘नो एंट्री’चा बोर्ड नसल्याने कुठल्या मार्गाने जावे हे कळत नाही. चुकून शहरात घुसल्यानंतर दंड ठोठावण्यात येतो, त्यामुळे आवश्यक तेथे "नो एंट्री'चा बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी ट्रक चालकांनी केली.
रात्रभर पोलिस तैनात
१२मेपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली, पण अनेकांना नवीन नियम माहीत नसल्याने पहिले चार-पाच दिवस आम्ही फक्त सूचना करून ट्रकचालकांना सोडून दिले, पण त्यानंतरदेखील नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे आम्ही सरळ दंडाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ही मोहीम जोरदार सुरू असून रात्रभर आम्ही प्रत्येक चौकात उभे राहत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. शहरात रात्रभर तीन पथके तैनात केली असून रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक प्रत्येक जागेवर उभे असतात.
कारवाई सुरू राहणार
- सुरुवातीचे काही दिवस मोहीम शिथिल केली होती. कारण अनेकांना नियमांची माहिती नव्हती, पण आता जोरदार मोहीम सुरू केली आहे. यापुढेही कारवाई केली जाणार आहे.
अनिल काचमांडे, उपनिरीक्षक, वाहतूक विभाग.