आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजच्या सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याऐवजी वाळूज ग्रामपंचायतीने त्याची रेकॉर्डला नोंद घेतली. त्या जागेचा नमुना नं. 8 चा उताराही अतिक्रमणधारकास दिला. त्यामुळे अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अशोक पाटील काकडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत काकडे यांनी म्हटले की, येथील झेंडा मैदान चौकाच्या पूर्वेकडील काकडे वसाहतीत अशोक पाटील काकडे हे त्यांच्या मिळकत क्र.५७ मधील घरात सहकुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे घराचे पीआर कार्डदेखील आहे. या घरासमोरील पूर्व बाजूस ३० फुट रुंदीचा उत्तर-दक्षिण सार्वजनिक रस्ताही आहे. या रस्त्यावर कैलास भाग्यवंत यांनी दोन पत्र्याच्या खोल्या बांधून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे माझ्यासह नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येत नाही. रहदारीला अडथळा करणारे अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली.
मात्र, ग्रामपंचायतीने कार्यवाही करण्याऐवजी संबंधित अतिक्रमणधारकाच्या अतिक्रमणाची रेकॉर्डला नोंद घेऊन त्यांचा नमुना नं.८ चा उतारा दिला, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे,अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सरपंच रंजना भोंड तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एन.के.वाघमारे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रकरण माझ्यापूर्वीचे
- जागेचा वाद मी येथे रूजू होण्यापूर्वीचा आहे. शिवाय, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही.
एस. सी. लव्हाळे, ग्रामविकास अधिकारी
प्रकरण न्यायप्रविष्ट
- या जागेसंदर्भातील वाद गंगापूर दिवाणी न्यायालयात सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जास्त बोलणे उचित नाही.
कैलास भाग्यवंत, काकडे वसाहत, वाळूज
बातम्या आणखी आहेत...