सोलापूर - ओव्हर लोड विनापावत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर शुक्रवारी तिऱ्हे मंडलाधिकारी मनोज मेंगर्ती यांनी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ओव्हरलोड विना पावत्या वाळू वाहतूक करीत असलेल्या एका ट्रकला ७६ हजार ६२५ रुपये याप्रमाणे लाख ३६ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ट्रकचालकांनी दंड भरल्यानंतर सर्व वाहने सोडून दिली.
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अवैध ओव्हरलोड वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. यानुसार मंडलाधिकारी मेंगर्ती शुक्रवारी तिऱ्हे ओव्हरलोड वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. एमएच १४ सीपी १९५१, एमएच २५ यू २७००, एमएच १२ ४७२६, एमएच १३ एएक्स ३५४५, एमएच १३ एएक्स ४७७१, एमएच ४४ ६९७१, एमएच १३ एएक्स २२८४ या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांमध्ये ११ वाहनांवर कारवाई...
मागील आठ दिवसांत अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ११ वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये वाहनांवर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर इतर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा शुक्रवारी कारवाई केली.