आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर मनसेचा दोन तास रास्ता रोको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- तालुक्यातील बोरसर आणि लासूरगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत समस्या प्रशासनाने मार्गी लावाव्यात यासाठी सोमवारी मनसेच्या वतीने दहेगाव येथील महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सदाफळ, तालुका सचिव कल्याण दांगोडे, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष योगेश राजपूत, शहर सचिव ज्ञानेश्वर टेके आदींच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. वैजापूर ते लासूर स्टेशनपर्यंतचा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ते विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे.
शिवाय वाहनधारकांकडून टोलवसुली केली जात आहे. हा सर्व प्रकार थांबवण्याची मागणी या वेळी करण्यात आली. तसेच शिवना टाकळी प्रकल्पातून बोरदहेगाव मध्यम प्रकल्पाला जोडणार्‍या उजव्या कालव्याच्या चारी क्रमांक 11 चे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. ते पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. महावितरण कंपनीने मीटर रीडिंग न घेता बिल देण्याचा सपाटा लावला आहे, ते तत्काळ बंद करावे, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे तालुका उपाध्यक्ष अँड. अनिल वाळुंज, सतीश शिंदे आदी सहभागी झाले होते.