आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही कॅमेरे लावा अन् वाहन जाळणाऱ्यांना पकडा- आंदोलकांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या चार वर्षांत बजाजनगर आणि वडगाव कोल्हाटी भागातील वाहने जाळण्यात आली. अखेर नागरिकांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी थेट शुक्रवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांची भेट घेतली. आयुक्तांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या. मात्र, प्रशासनानेच सीसीटीव्ही लावावेत, असा
आग्रह नागरिकांनी धरल्याने एमआयडीसी आणि उद्योजकांच्या मदतीने हे काम करू, असे आयुक्तांनी सांगितले.

आयुक्तांसोबत झालेल्या बैठकित नागरिकांचा रोष प्रसारमाध्यमांसमोर येऊ नये यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटीच्या वेळी दूर ठेवण्यात आले. शिष्टमंडळात अनिल चोरडिया, प्रकाश चौधरी, अॅड. नितीन ठोळे, रामकिसन शेळके, अनिल जाभाडे यांचा सहभाग होता.

उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
सीसीटीव्ही प्रशासनानेच लावावेत असा आग्रह नागरिकांनी धरला. मात्र, एमआयडीसी आणि उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
वाळूज परिसरात सुरू असलेल्या वाहन जाळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी शुक्रवारी वाळूज पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून वाहन जाळणाऱ्यांना पकडण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी त्यांना केले.