आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस, महोत्सवातून विद्यार्थ्यांची होणार सोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी ‘स्नेहभोजन’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश नुकताच शालेय शिक्षण विभागाने काढला आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीत वाढ कुपोषण मुक्तता करण्यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी योजनेमध्ये लोकसहभागाचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शालेय पोषण आहार योजनेत वैविधता, नावीन्यता आणण्यासाठी विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाढीस उपयोगी असणारी पूरक पोषणमूल्य प्राप्त होतील. आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना अन्नपदार्थांचा स्वाद घेता येईल.

असा असेल स्नेहभोजन उपक्रम
गावातीलव्यक्तींचे वाढदिवस, सुवर्णमहोत्सव, अमृतमहोत्सव यासारख्या बाबींचा विशेष दिनात समावेश आहे. स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेला करावे लागेल. शालेय पोषण आहारासोबत मिठाई, सुकामेवा, फळे यांचा समावेश असावा. आयोजकाकडून रोख स्वरूपात पैसे घेता विद्यार्थ्यांना पोषणासाठी आवश्यक बाबींचाच स्वीकार करावा लागणार आहे. ‘स्नेहभोजन’ उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षताही घ्यावी लागणार आहे.