आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Atul Kulkarni Guide Student In Central Youth Festival

युवक महोत्सव: विद्यार्थ्यांनो, स्वत:च्या पाठीशी उभे राहा - अभिनेते अतुल कुलकर्णी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यशाला शॉर्टकट नसतात. यश मिळवण्याचा आिण ते टिकवण्याचा मार्ग अतिशय खडतर असतो. त्यामुळे या कलाप्रकारांकडे विद्यार्थ्यांनी अतिशय गंभीरपणे पाहावे. कुणी आपल्याला मदत करेल आिण मग मी यशस्वी होईन, अशा स्वप्नरंजनात रमण्याऐवजी यशासाठी स्वत:च्याच पाठीशी ठामपणे उभे राहा, असा सल्ला प्रख्यात अभनिेते अतुल कुलकर्णी यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने आयोजित केलेल्या केंद्रीय युवा महोत्सवाच्या समारोपात ते बोलत होते. त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक ऐकत विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी दाद दिली.

पुढील महोत्सवात धमाल करण्याबरोबरच बक्षिसांवर आपले नाव कोरण्याचा संकल्प करत विद्यार्थ्यांनी नव्या मित्र-मैत्रिणींचा निरोप घेतला.
१४ डिसेंबरपासून विद्यापीठात रंगलेल्या केंद्रीय युवा महोत्सवाचा मंगळवारी समारोप झाला. सोनेरी महाल परिसरातील मुख्य रंगमंचावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. कुलसचिव धनराज माने, बीसीयूडीचे संचालक डॉ. के. व्ही. काळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अशोक मोहेकर, अधिष्ठाता डॉ. उल्हास शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद अध्यक्ष लखनलाल भुरेवाल, सचिव माधुरी मिरकर आदी उपस्थित होते.

जे काही कराल त्यात पूर्ण जीव ओता
आयुष्यातप्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ज्या त्या वेळी योग्य गोष्टी केल्या तर आयुष्य समृद्ध होतं. तारुण्य हे स्वत:च्या प्रतिमेला आिण करिअरला निर्णायक वळण देणारं वय आहे. या उमलत्या वयात शिक्षणासोबत प्रेम करा अन् स्वत:च्या छंदाचं, कलेचं रूपांतर व्यवसायात करा. मात्र, जे काही कराल त्यात पूर्ण जीव ओता. उडाणटप्पू पद्धतीने कलेकडे पाहू नका. आपली कलेची आवड, कलेचा दर्जा कलेचं व्यवसायात रूपांतर करणे यशस्वी कलांवत होण्याची त्रिसूत्री आहे. शालेय अभ्यासक्रमात कलेला "एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीज'मध्ये टाकून दुय्यम लेखलं जात. वास्तविक कोणतीही कला आपल्याला सुखी बनवते. यातूनच सुखी समाज निर्माण होतो, असेही ते म्हणाले.
-उत्कृष्ट ग्रामीण संघ : यशवंतरावचव्हाण महाविद्यालय, तुळजापूर.
-उत्कृष्टसंघ : देवगिरीमहाविद्यालय, औरंगाबाद.
-संगीतगट उत्कृष्ट संघ : शिवाजीमहाविद्यालय, कन्नड.
-नृत्य-उत्कृष्ट संघ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
-नाट्यगट उत्कृष्ट संघ : देवगिरीमहाविद्यालय, औरंगाबाद यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर.
-ललितकला गट उत्कृष्ट संघ : कलामहाविद्यालय, औरंगाबाद.
-लोककलाउत्कृष्ट संघ : देवगिरीमहाविद्यालय, औरंगाबाद.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...