आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Makarand Kulkarni Speak With Divymarathi,com

\"कलाकार असलो, तरी मीही या समाजाचे काही देणे लागतो...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "भारता'चा "इंडिया' होताना आपल्या देशात अनेक स्थित्यंतरं झाली. एक कलाकार म्हणून हे पाहताना क्षुल्लक समस्यांनी मला अस्वस्थ केले. सर्वांची दु:खे सारखीच असतात. पण, काहीही नसताना समाजाने माझ्यासाठी जे दिले त्यामुळे मी कलाकार झालो. म्हणून मीही या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतूनच मी स्वच्छतादूत झालाे, अशी प्रांजळ कबुली अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिली.
"कुठं सापडंना राव, गुगलगाव' या ग्रामस्वच्छतेवरील चित्रपटाच्या शुटिंगचा समारोप शनविारी हविरे बाजारमध्ये झाला. या चित्रीकरणासोबत अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोगलगावचे सरपंच योगेश म्हस्के व ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवले. त्याचे अनुभव त्यांनी "दवि्य मराठी'ला कथन केले. अनासपुरे म्हणाले, ग्रामीण भागाविषयी मला आत्मियता आहे. महाविद्यालयीन वयात सुमारे ५०० पथनाट्ये केली होती. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील समस्यांची जाण होती.
सामाजिक भान असलेले सिनेमे मला मिळाले, ही एक जमेची बाजू होती. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात आल्यावर त्यावर चित्रपट काढायचे ठरवले अन् "गोष्ट छोटी डोंगराएवढी' बनवला. "कायद्याचे बोला' चित्रपट करतानाच लाचखोरीबाबत जनजागृती करायचे ठरवले. "गुगलगाव' करताना ग्रामस्वच्छता अभियान राबवले. सर्वप्रथम गावातील वेड्या बाभळी काढल्या. पडके वाडे काढले. ग्रामसभेतून लोकवर्गणीचे आवाहन केले. त्यातून दहा-बारा लाख रुपये गोळा झाले. मीही सिमेंट आणून देत खारीचा वाटा उचलला. वृक्षारोपण करताना प्रशासकीय मदत मिळाली.
केवळ दोन गटांतील राजकारणामुळे गावाचा विकास खुंटतो. पण, सर्व घटक एकत्र आले, तर निश्चित विकास होतो. गोगलगावात आम्ही अवघ्या पंधरा दविसांत ६० शोषखड्डे बांधले. मुलांच्या वाया जाण्याचे कारण असलेली, त्यांच्या बसण्याचे ठिकाण असलेली गावातील पडकी वेस मी काढायला लावली. एकमेव पानटपरीवाल्याला विनंती करून पान, तंबाखू, गुटखा विक्री बंद करायला लावली. आता तो खारीक, खोबरे विकतो. गावात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, हा विचार गावकऱ्यांवर बिंबवला.
आपल्याकडे शिकून अडाणी राहिलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शिकलेल्यांना सुशिक्षित कसे करायचे, हीच आपली मोठी समस्या आहे. समाजात सकारात्मक बदल होतात. त्यासाठी आदरभाव असलेल्या व्यक्तीला सोबत घेऊन काम करावे. शाळेत मुलाचे नाव घालताना त्याने एक तरी झाड लावावे, ते जगवावे, अशी अट असावी, अशी अपेक्षा अनासपुरे यांनी व्यक्त केली. शुटिंगच्या काळात अनासपुरे यांनी स्वत: एक वेगळा माहितीपट तयार केला आहे. त्याद्वारे सोशल संदेश द्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छता अभियानात "पांढरे कपडे' नकोच
पांढऱ्या कपड्यावर डाग चांगला दिसत नाही. त्यामुळे हा कपडा स्वच्छता अभियानातील मोठा अडथळा आहे. त्यामुळे "पांढरे कपडे नकोच', असा माझा आग्रह आहे. खरे तर पांढऱ्या कपड्यांनीच देशाचे वाटोळे केले आहे, असा टोलाही अनासपुरे यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. माध्यमांनी सकारात्मक वार्तांकनाला ठळकपणे महत्त्व दिले, तर समाजात नक्कीच सकारात्मक बदल होतो, असेही अनासपुरे यावेळी म्हणाले.