आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Makrand Anaspure Vehicle Checked By Election Division

अभिनेता मकरंदच्या वाहनाची झडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - निवडणूक विभागाच्या स्थिर पथकाने सोमवारी अभिनेता मकरंद अनासपुरे याच्या वाहनाची झडती घेतली. वाहनात काहीच न सापडल्याने मकरंदचे वाहन सोडून दिले.
सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी औरंगाबादेत आला होता. सायंकाळी तो मुंबईकडे जात असताना वैजापूर येथील गंगापूर चौफुलीवर निवडणूक विभागाच्या पथकाने त्याचे वाहन अडवले. चालकाने गाडीत मकरंद असल्याची माहिती दिली; परंतु पथकाने काहीही न ऐकता वाहनाची कसून तपासणी केली. तपासणीनंतर वाहन सोडून दिले, मात्र, जाण्यापूर्वी अधिका-यांनी मकरंदसोबत फोटोसेशन करून घेतले.