आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगाच नव्हे, तर मुलगीही असू शकते वंशाचा दिवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुलगाच नव्हे तर मुलगीही आपल्या वंशाचा दिवा असू शकते, तिलाही आपण मुलाप्रमाणेच जीव लावून वाढवले, शिकवले तर तिही आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करू शकते, असे मत सिनेअभिनेता साहेबराव पाटील यांनी व्यक्त केले.

सामाजिक विषयावरील वेगळ्या धाटणीचा "रजनी' मराठी चित्रपट आहे. यातून मुलगीही घराचे नाव रोशन करुन शकते, त्यासाठी वंशाचा दिवा म्हणून मुलीकडे ही सर्वांनी पहावे, मुलगीच जन्माला आली नाही तर आगामी काळात प्रत्येकाला वंशाला दिवा आणि आई, पत्नी कशी मिळेल हा ही चिंतेचा विषय ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव करता मुलीलाही आपला मुलगाच मानावा, असेही ते म्हणाले. यात मी सखाराम (साहेबराव पाटील) चे पात्र साकारले आहे. माझी एकुलती एक मुलगी म्हणून रजनी (रजनीगंधा राजूरकर) हिला मुलगाच समजून मी मोलमजुरी हमाली काम करुन मिळणा ऱ्या पैशात स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत जिद्दिने शाळा शिकवतो. त्यात रजनीही मन लावून अभ्यास करते आणि दहावीच्या परिक्षेत ती राज्यातून पहिली येते. यातून मी उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होते. यातून गरीब असो वा श्रीमंतानी आपल्या मुलांना जिद्दिने शिकवावे, असाही संदेश देण्यात आला आहे.

या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन संजय राजूरकर यांनी केले आहे. यात कलाकार म्हणून साहेबराव पाटील, रंजना तुलसी, रंजनीगंधा राजूरकर, कुसूम मोगरे, वैजीनाथ गमे, जितेंद्र कोळी, ब्रिजेश पांडे, गजानन कुलकर्णी, जय मांडवे, पवार, लोखंडे, आढाव स्थानिक कलावंताचा सहभाग आहे. या चित्रपटाला संगीत ब्रिजेश पांडे यांनी िदले आहेत. तर गीत मुरलीधर जाधव,तर राजेंद्र वैराळ यांनी चित्रपटातील गीते गायली आहेत. या चित्रपटाचे हर्सुल सावंगी औरंगाबाद शहरात चित्रीकरण झाले.

रजनीचा मे ला प्रदर्शनपूर्व सोहळा
संजयराजूरकर निर्मित दिग्दर्शित "रजनी' या मराठी चित्रपटाचा प्रदर्शन पूर्व सोहळा मे रोजी दुपारी वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह (मसाप,औ.बाद) येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी हे राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे, ज्येष्ठ नाटककार अजित दळवी, चित्रपट दिग्दर्शक देवदत्त म्हात्रे, औरंगाबादचे अंॅटिक्रप्शन ब्युरोचे प्रवीणजी मोरे आदी उपस्थित राहणार आहे.
फोटो - रजनी या मराठी चित्रपटामध्ये सखारामच्या भूमिकेत साहेबराव पाटील, रजनीगंधा राजूरकर.