आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या मातीत जे पेराल ते उगवतेच, अभिनेता संदीप पाठक यांनी व्यक्त केली कृतज्ञता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत खूप टॅलेंट आहे. आपला भाग दुष्काळी असला तरी इथे जे पेराल ते उगवतेच. येथील मुले पुण्या-मुंबईच्या तुलनेत स्वत:चे प्रमोशन करण्यात कमी पडतात. आता ग्रामीण भागातील तरुणही टेक्नोसॅव्ही झाले आहेत. तेव्हा व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून स्वत:चे प्रमोशन जरूर करा, असा सल्ला प्रसिद्ध मराठी अभिनेता संदीप पाठक याने दिला. 
 
सृजन २०१७ या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्रांगणात झाला. या वेळी प्रमुख पाहुणा म्हणून संदीप पाठक उपस्थित होता. कार्यक्रमास कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे, त्यांच्या पत्नी नलिनी चोपडे, कुलसचिव प्रदीप जब्दे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक मुस्तजीब खान, नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख जयंत शेवतेकर, प्रा. दासू वैद्य, प्रा. संजय मोहोड आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू म्हणाले, नाट्यशास्त्र विभागाच्या प्रांगणात मंडप घालावा लागला. आता या विभागाला मी स्वतंत्र असे सभागृह बांधून देणार आहे. 
 
आयनाय तर काय नाही.. 
संदीपम्हणाला, मी इथेच वाढलो. मला माझ्या विद्यापीठाने बोलावल्याने आईकडे आल्यासारखे वाटत आहे. आपल्या मूळ गावाला म्हणजे आईला कधी विसरू नका. आय नाय तर काय नाय, हे लक्षात ठेवा. मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरीही माझे मूळ गाव बीड जिल्ह्यातील माजलगाव असल्याचे आवर्जून सांगतोच, या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. 
 
क्लिप पाहून झाला भावूक : संदीपच्या भाषणाआधी त्याच्या करिअरवर एक क्लिप दाखवण्यात आली. ती पाहताना त्याचे डोळे पाणावले. भाषणाला उभे राहिल्यानंतर भावूक होत तो म्हणाले, माझ्या आईने मला घरी सत्कारासाठी बोलावल्यासारखे वाटत आहे. शिक्षणासाठी औरंगाबादला आलो. स.भु. महाविद्यालयात प्रा. दिलीप घारे, प्रा. यशवंत देशमुख यांनी मला घडवले. पुढे विद्यापीठात प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या सहवासाने खूप काही शिकलो. 
बातम्या आणखी आहेत...