आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Asha Parekh And Union Minister Nitin Gadkari Issue

आशा पारेख: अनपेक्षित प्रश्नामुळे नितीन गडकरींचा उडाला गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांच्या पद्मभूषण प्रकरणावर छेडताच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी जागेवरच गारठले. शांतपणे पत्रकारांना सामोरे गेलेले गडकरी या अनपेक्षित प्रश्नाने सर्द झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. प्रश्नांच्या फैरींवर मौन बाळगत ते विवाह स्थळापासून बाहेर पडले.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कन्येच्या लग्न समांरभानिमित्त गडकरी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता बीड बायपास रोडवरील लग्नस्थळी आले. त्यांच्यासमवेत उद्योगपती विवेक देशपांडे, अामदार अतुल सावे, नारायण कुचे होते. वधू-वरांना आशीर्वाद देऊन अवघ्या पाच मिनिटांत ते मंडपातून बाहेर पडले. तेवढ्यात त्यांना पत्रकारांनी घेरले. झेड प्लस सुरक्षा रक्षकांनी सुरुवातीला पत्रकारांना मागे ढकलले होते. मात्र, आमदार सावे यांनी गडकरी यांना, ‘पत्रकारांना बोलायचे आहे’, असे म्हणताच ते थांबले.

आधी मंद स्मित, मात्र नंतर मौन...
पत्रकारांकडूनविकासात्मक प्रश्न येईल अशी अपेक्षा असल्याने गडकरी मंद स्मित करत होते. पहिलाच प्रश्न आला तो, आशा पारेख यांच्या पद्मभूषण पुरस्कारावरून सुरू झालेल्या वादावर. हा प्रश्न येताच गडकरींच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. गडकरी या प्रश्नावर गोंधळल्यासारखे दिसले. स्व:ला कसेबसे सावरत मौन राखणेच पसंत करीत ते गाडीत बसले. त्यांनी पत्रकारांना कोपरापासून हात जोडले आणि गाडी सुसाट वेगाने विमानतळाकडे निघाली.