आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चष्मा लावणाऱ्या मुलींचा आत्मविश्वास वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांत काम करणे मला आवडते. कुठल्याही एका माध्यमात स्वत: बांधून घेणे म्हणजे आपल्या प्रतिभेला चौकटीत कोंडण्यासारखे आहे. "जस्सी जैसी कोई नहीं' या पहिल्याच मालिकेतील भूमिकेने मला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेनंतर ज्या मुली दातांना क्लिप लावायच्या, भिंगाचा चष्मा घालायच्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला, असा दावा अभिनेत्री मोना सिंहने दिले.

लिवॉन हेअर कंडिशनरची ब्रॅँड अॅम्बेसेडर म्हणून तिने शहरातील काही गृहिणींशी संवाद साधला. या वेळी "दिव्य मराठी'शी संवाद साधला. करिअरिवषयी बोलताना मोना म्हणाली, माझे वडील सैन्यात असल्याने मी भारतातील अनेक शहरांमध्ये भ्रमंती करत शिक्षण घेतले. २००१ मध्ये अभिनेत्री होण्याचा माझा संघर्ष सुरू झाला. त्या वेळी आम्ही पुण्यात राहायला आलो होतो. पुणे-मुंबई रोज प्रवास करायचा आणि ठिकठिकाणी स्क्रीन टेस्ट, असा माझा दिनक्रम होता. २००३ ला ‘जस्सी जैसी कोई नहीं’ची संधी मिळाली. पहिलीच मालिका आणि त्यात आपण अतिशय साधारण मुलीसारखे दातांना क्लिप लावून, डोळ्यावर भिंगाचा चष्मा लावून वावरायचे हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता. कारण कुठल्याही अभिनेत्रीला आपण ग्लॅमरस दिसावे असे वाटत असते. पण मी आव्हान स्वीकारले, त्याचा फायदा झाला. या मालिकेत दातांना क्लिप लावून माझा वावर होता. मालिका झाल्यानंतर दातांच्या काही शस्त्रक्रिया कराव्या लागल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, मालिकेमुळे मी प्रेक्षकांना भावले. खूप पत्र माझ्यासाठी तेव्हा यायचे, ते पाहून माझा निर्णय योग्य ठरल्याचे समाधान मिळाले. पुण्यामध्ये अनेक फॅशन शोमध्ये मी काम केले. ‘क्या हुवा तेरा वादा'मध्येही मी तीन मुलांच्या आईची भूमिका केली. त्यानंतर ‘झलक दिखला जा'मध्ये नृत्यातून वेगळेपण सिद्ध झाले. त्यानंतर ‘एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा'चे निवेदन करण्याची संधी मिळाली. आता निवेदनाचे कामच मला अधिक आवडत असल्याचे मोना सिंहने सांगतले.