आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या समाजासाठी ‘चलो व्यसनमुक्ती की ओर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यसनमुक्ती हे एकविसाव्या शतकातील खूप मोठे आव्हान आहे. तंबाखू, धूम्रपान, दारूमुळे आजार होऊन मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे विविध स्तरांवर व्यसनमुक्ती अभियान राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. औरंगाबाद येथील चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनने याचे महत्त्व ओळखून व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यासाठी फाउंडेशन ‘चलो व्यसनमुक्ती की ओर’ हे अभियान राबवणार आहे. यामध्ये समुपदेशनाद्वारे जनजागृती केली जाईल आणि व्यसनमुक्त झालेल्या लोकांना या अभियानाशी जोडले जाईल.

या अभियानाचे अध्यक्ष विवेक रांदड, प्रकल्प प्रमुख मुरली गुंगे पाटील, जय बाहेती, कमल सारडा गेल्या दोन वर्षांपासून हे अभियान राबवत आहेत. आता ते व्यापक करण्याचे त्यांनी ठरवले आहे. रविवार, २१ डिसेंबर रोजी एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात या अभियानाचे उद््घाटन होणार आहे. हे अभियान जवळपास सहा महिने चालणार आहे. यामध्ये कमीत कमी ३०० लोकांना व्यसनमुक्त करण्याचे उद्दिष्ट फाउंडेशनने ठेवले आहे. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनासुद्धा या अभियानाशी जोडले जाणार आहे.
-दोन वर्षांपासून राबवत असलेले हे अभियान आता व्यापक करत आहोत. त्यादृष्टीने आम्ही पुरेपूर तयारी केली आहे. आमचे जवळपास ७० सदस्य कामाला लागले असून १५० लोकांची मदत घेणार आहोत. विवेकरांदड, प्रकल्पअध्यक्ष

-याअभियानामध्ये आम्ही लोकांचे समुपदेशन करणार आहोत. सलग महिने चालणाऱ्या या अभियानात सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो. मुरलीगुंगे पाटील, प्रकल्पप्रमुख
व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम
चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे अभियान, समुपदेशनाद्वारे करणार जनजागृती, सहभागी होण्याचे आवाहन
मदतीचा हात
तंबाखूचे सेवन केल्याने २५ प्रकारचे आजार होतात. हृदयरोगामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये २५ टक्के लोक धूम्रपान करणारे असतात. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ३० टक्के हिस्सा धूम्रपानाचा आहे. धूम्रपानामुळे फेफडॉक आजार होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे.

> तंबाखूचे सेवन करणाऱ्या महिलेच्या नवजात बाळाचे सरासरी वजन ७०० ग्रॅमने कमी असते.
> तंबाखूच्या सेवनाने दरवर्षी जगामध्ये ५० लाख (डब्ल्यूएचओनुसार) लोकांचा मृत्यू होतो. भारतात हा आकडा १० लाख आहे.
>तंबाखूच्या सेवनाने फुप्फुस आणि तोंडाचा कर्करोग झालेल्यांची संख्या २००१ मध्ये दीड कोटी आणि २०१० मध्ये तीन कोटी होती.
>भारतात विक्री होणाऱ्या गुटख्याच्या विविध ब्रँडची संख्या ४७० एवढी आहे.
> भारतात दररोज ५० हजार किशोरवयीन मुले तंबाखू खाण्यास सुरुवात करतात.