आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समाजयोजन करा; शिक्षण विभागाची सरकारकडून कानउघडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक छायाचित्र. - Divya Marathi
सांकेतिक छायाचित्र.
औरंगाबाद- अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन 31 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र सरकारचे नियम खुद्द सरकारचा भाग असलेल्या शिक्षण विभागाने न जुमानल्याने अद्यापही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होवू शकलेले नाही. झालेल्या आढावा बैठकीत अद्यापही समायोजनाचे काम अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची चांगलीच कानउघडणी करत त्वरीत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा, अशा सूचना देणारे पत्र शिक्षण आयुक्तांनी जाहीर केले असून, त्यात औरंगाबादच्या शिक्षण विभागास 21 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
 
औरंगाबादमध्ये 109 माध्यमिक शिक्षक अतिरिक्त
आरटीईच्या नियमानुसार झालेले बदल अन् विद्यार्थी संख्येच्या तुलनेत असलेली विद्यार्थी संख्या पाहता. अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त आढळून आले होते. जवळपास 30 ते 35 हजार शिक्षक राज्यभरात अतिरिक्त आहेत. औरंगाबादमध्ये 109 माध्यमिक शिक्षक अतिरिक्त असून, प्राथमिक शिक्षकांचा आकडाही शंभरीच्या आसपास आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयातील 72 शिक्षक अतिरिक्त आहेत. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
 
शाळांची पटपडताळणी
महसूल विभागाने 2012-13 मध्ये शाळांची पटपडताळणी केली होती. त्यात बोगस विद्यार्थी, अर्थहितासाठी विद्यार्थी संख्या नसतांनाही पैसे घेवून भरलेले शिक्षक सुविधांचा अभाव अशा अनेक बाबी समोर आल्या होत्या. यात अनेक शिक्षक अतिरिक्त झाले होते. शिक्षक समायोजनात होत असलेला बेबनाव, अतिविलंब आणि संस्थाचालक शिक्षकांना सामावून घेत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने शिक्षकांचे समायोजन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यानुसार अतिरिक्त शिक्षकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्जही मागविण्यात आले.परंतु अद्यापही त्या शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. यावर शिक्षण आयुक्तांनी पत्राद्वारे शिक्षकांचे समायोजन त्वरीत करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
या तारखेपर्यंत करायचे आहे समायोजन - 
- नागपूर 13 सप्टेंबर, अमरावती 14, कोल्हापूर 18, लातूर 19 सप्टेंबर, मुंबई 20 सप्टेंबर, औरंगाबाद 21 सप्टेंबर, नाशिक 22 आणि पुणे 23 सप्टेंबर आदी.
 
बातम्या आणखी आहेत...