आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडगाव सरकला भरली विद्यार्थ्यांविनाच शाळा, शिक्षणाधिका-यांच्या भेटीत आला प्रकार समोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर शुक्रवारपासून शाळांचे द्वितीय सत्र सुरू झाले. पुन्हा शाळा सुरू झाल्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळांमध्ये कशी अवस्था आहे, याची पाहणी करण्यासाठी शिक्षणाधिका-यांसह 162 अधिका-यांनी 600 शाळांना भेटी दिल्या. आडगाव सरक येथील शाळेत सात शिक्षक हजर होते. मात्र, एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे दिसून आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी आरटीईनुसार अभ्यासक्रम आणि केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे काम सुरू आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी 120 केंद्रप्रमुख, 30 शिक्षण विस्तार अधिकारी, नऊ गटशिक्षणाधिकारी, दोन उपशिक्षणाधिकारी आणि स्वत: शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी 1300 पैकी 600 शाळांना भेटी दिल्या. यात सर्वच शाळांत कमी-जास्त प्रमाणात विद्यार्थी आढळून आले. देशमुख यांनी माहोली उर्दू प्राथमिक शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा आडगाव सरक, लोहगड हायस्कूल आडगाव सरक, अंजनडोह, अंजनडोह तांडा, डोणवाडा येथील शाळांना भेटी दिल्या. यात इतर शाळांमध्ये तुरळक विद्यार्थी आढळून आले. केंद्रीय प्राथमिक शाळा आडगाव सरक येथील शाळेत 250 विद्यार्थी हजेरीपटावर आहेत. प्रत्यक्ष शाळेच्या पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे दिसून आले. सर्व शिक्षक कट्ट्यावर बसल्याप्रमाणे गप्पा मारत असल्याचे दिसून आले. स्वच्छतेचाही अभाव दिसून आला. त्यामुळे त्या सात शिक्षकांवर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.