आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Adhaar Important For Gas Cylinder After Assembly Election, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणुकीनंतर गॅस सिलिंडरसाठी ‘आधार’ची सक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीपूर्वी गॅस सिलिंडर सबसिडी योजनेला दिलेली स्थगिती महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर उठवण्यात येणार असून गॅस सिलिंडरसाठी आधार कार्ड सक्तीचे होणार आहे.केंद्रात यूपीएचे सरकार सत्तेवर असताना आधार कार्ड संलग्नीकरण केल्यावरच गॅस सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा करण्याची योजना सुरू केली होती.
त्यात राज्यातील दहा जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने केंद्र सरकारने १० मार्च २०१४ रोजी योजनेला स्थगिती दिली होती. मोदी सरकारने सत्तेवर आल्याच्या तिस-याच महिन्यात ही योजना सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र हरियाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे नोव्हेंबरअखेर अथवा डिसेंबरमध्ये ही योजना सुरू करण्याच्या सूचना गॅस कंपन्यांकडून एजन्सी चालकांना दिल्या आहेत.

आधार संलग्नीकरण करून बँकेत अनुदान देण्याची योजना पुन्हा सुरू होणार असल्याच्या सूचना मिळाल्या आहेत.त्यामुळे आम्ही पूर्वतयारी करून ठेवली आहे, असे मंगेश गॅस एजन्सीचे संचालक मंगेश आस्वार यांनी सांगितले.