आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावईबापूंना मिळणार आता ‘रेडिमेड वाण’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अधिक महिन्यात जावयाला वाण दिल्याने पुण्य लागते. त्यामुळे नोकरदार महिला वेळेअभावी रेडिमेड वाण घेण्याकडे पसंती देत आहेत. रेडिमेड अनारशांची ऑर्डर देण्यासाठी महिलांची बाजारात झुंबड उडत आहे. शुक्रवारी पिठोरी अमावास्या असल्याने महिलांनी खरेदी करण्याऐवजी वस्तूंची पाहणी करून ऑर्डर देणे पसंत केले.

नवदांपत्यास पहिला धोंडा करण्यासाठी सासूबाई विशेष तयारी करीत आहेत. तसेच जावयास उपयुक्त अशी वस्तू देण्याचा ट्रेंड आहे. जावयाला 33 प्रकारे दान देण्याचे महत्त्व आहे. तसेच 33 अनारसे देण्याची जुनी परंपरा आहे, परंतु नोकरदार सासवांना आता वेळेअभावी घरी अनारसे तयार करणे शक्य नसते. तसेच वय वाढल्यामुळे काम करणे शक्य नाही म्हणून आता महिला रेडिमेड अनारसे घेण्यास पसंती देत आहेत. आता बाजारात अनारसे हे साखर, गूळ, साजूक तुपातील तसेच तेलातील अशा विविध प्रकारांत उपलब्ध झाले आहेत. तसेच काही महिला अनारशाचे पीठ घेऊन घरीच अनारसे तयार करत आहेत. यासाठी खसखस, तांदूळ, गूळ किंवा साखर लागते. तसेच जाळीदार पदार्थांना जास्त महत्त्व आहे. लहान व मोठय़ा आकारांत धोंडेसुद्धा बाजारात आले असून आकारानुसार त्याच्या किमती आहेत. पुरणाचे, खोबर्‍याचे धोंडे तयार मिळत आहे. खाण्याच्या पदार्थांबरोबरच वस्तू व कपडे दिले जातात. यात तांब्याच्या वस्तू, दिवे, संध्यापात्र, फुलपात्र, पळी, ताट, तांब्या देतात. याबरोबरच पितळी व स्टीलची भांडी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली आहे.

दीपदानाचे महत्त्व : दीपदान देण्याची प्रथा असल्याने जावयांना दीप तसेच समई त्याबरोबरच गृहोपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. पुस्तक वाचण्याचा छंद असणार्‍या जावयांना वाचनीय पुस्तके देण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. पुस्तके 3 पिढय़ांचे धन असल्याने हा ट्रेंड रुजत आहे.