आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंसोबत खैरे-जैस्वालांच्या मुलांचे ‘प्रोजेक्शन’; युवा सेनेतही गटबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेची भविष्यातील धुरा सांभाळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवासेनेची स्थापना करून आपले चिरंजीव आदित्य ठाकरे यांना राजकारणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. सध्या आदित्य यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. बुधवारी औरंगाबादेत विविध ठिकाणी युवा सेनेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेमकी ही संधी साधत स्थानिक राजकारणात खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनीदेखील आपल्या मुलांना राजकारणात प्रोजेक्ट केल्याचे चित्र स्पष्ट झाले. मात्र, युवा सेनेतील गटबाजीचे राजकारण या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून दिसून आले.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उमेदवार कोणताही असो, रंग भगवा आणि चिन्ह धनुष्यबाण हे ध्येय समोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ऋषिकेश खैरे यांनी कन्नडमध्ये विद्यार्थी मेळावा घेतला, तर महाविद्यालय कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल यांनी संत तुकाराम नाट्यगृहात स्वतंत्र विद्यार्थी मेळावा घेतला. कन्नड येथे झालेल्या ऋषिकेश खैरेंच्या मेळाव्याला ऋषिकेश जैस्वाल, तर ऋषिकेश जैस्वालांच्या कार्यक्रमाला ऋषिकेश खैरे उपस्थित नव्हते. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमधील गटबाजी आता त्यांच्या मुलांमध्येही दिसून येत आहे. शहरात झालेल्या विद्यार्थी मेळाव्याला विद्यार्थी आणि युवा सैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. ऋषिकेश जैस्वाल कार्यक्रमाचे आयोजक होते. मेळाव्याला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, विनोद घोसाळकर, महापौर कला ओझा, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, किशनचंद तनवाणी, अनिल देसाई, जगन्नाथ काकडे, बंडू ओक, राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, ऋषिकेश खैरे आणि ऋषिकेश जैस्वालांनी केला स्वतःचा बचाव