आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aditya Thackeray Meet Farmers In Aurangabad Districts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला कधीच वार्‍यावर सोडणार नाही : आदित्य ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औराळा - शेतकर्‍यांनी आत्महत्या करणे हा उपाय नसून येणार्‍या काळात गारपीट, दुष्काळजन्य परिस्थिती आली तरी तुम्ही आत्महत्या करणार नाहीत, असे मला वचन द्या. मी तुम्हाला वचन देतो की, शिवसेना सत्तेत असो अथवा नसो, तुम्हाला कधीही वार्‍यावर सोडणार नाही, असे आश्वासन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. ते कन्नड तालुक्यातील चापानेर औराळा येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाप्रसंगी बोलत होते.

चापानेर येथील शेतकरी बाळू पवार औराळा येथील निवृत्ती गायकवाड या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाख, तर शिवसेनेकडून एक लाख अशी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत केली. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संदिपान भुमरे, हर्षवर्धन जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, कन्नड तालुकाप्रमुख डॉ. अण्णा शिंदे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश खैरे, तालुकाप्रमुख धीरज पवार, विभागप्रमुख रवींद्र निकम, राम जाधव, रमेश वारे, राजू भारतीया, योगेश पवार आदी उपस्थित होते.

औराळा दौरा रद्द, चापानेरलाच मदत
आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री रामदास कदम औराळा येथील पीडित कुटुंबाला भेट देणार होते. त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी गावात बॅनर लावले होते. तसेच देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. परंतु अचानक दौरा रद्द झाल्याने पीडित कुटुंबासह कार्यकर्त्यांची तारांबळ झाली. पीडित कुटुंबीयांना चापानेर येथे बोलावून मदत देण्यात आली.

ठाकरेंनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन
खुलताबादयुवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांनी रविवारी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी घोडेगावचे शेतकरी सांडू पंुजाजी जाधव यांची व्यथा ऐकून त्यांना धीर दिला. त्यांच्या सोबत खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री रामदास कदम उपविभागीय अधिकारी राजू नंदकर, तहसीलदार बालाजी शेवाळे, गणेश आधाने उपस्थित होते.

औराळा येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला भेट देऊन एक लाख रुपयांची मदत केली. या वेळी आदित्य ठाकरेंनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. या वेळी पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने आदी.