आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Administrator Sunil Kendrekara, Latest News In Divya Marathi

सिडको वाळूज महानगरच्या कामाला आजपासून प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडकोतील ऑडशेप भूखंडाच्या प्रत्येक प्रस्तावाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे. योग्य ठिकाणी ऑडशेपला मंजुरी देऊ, मात्र जेथे भूखंड बळकावल्याचे दिसून येईल तेथे कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया 9 मे रोजी औरंगाबाद दौर्‍यावर आले असता त्यांना नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. घराला लागून असलेल्या मोकळ्या जागा (ऑडशेप) संबंधित घरमालकांनाच विकत द्याव्यात, अशी मागणी या निवेदनात होती. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’शी बोलताना केंद्रेकर यांनी त्यांचा आक्रमक इरादा जाहीर केला. ते म्हणाले की, माझ्याकडे यापूर्वी ऑडशेपचे काही प्रस्ताव आले होते. मात्र, ते नियमबाह्य असल्याने त्यात काही करता येणार नाही, असे मी स्पष्ट केले होते. त्यानंतर अचानकपणे भाटियांसमोर काही मंडळींनी 200 पेक्षा अधिक ऑडशेप प्रस्ताव असल्याची माहिती दिली. त्यासोबत ती निकाली काढण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मला त्यात संशय आला. म्हणून मी अधिकार्‍यांना निर्देश देऊन सर्व प्रस्तावांची माहिती मागवली. तेव्हा किमान एक हजार ऑडशेपच्या जागा असल्याचे समोर आले आहे. त्यात बहुतांश ठिकाणी मोक्याचे भूखंड बळकावण्याचाच प्रकार झाला आहे. त्यावर छोटी मोठी बांधकामे करून लोक मोकळे झाले आहेत. हे सरळ सरळ कायद्यालाच आव्हान आहे. हा प्रकार मी खपवून घेणार नाही. त्यामुळेच प्रत्येक प्रस्तावाची सखोल चौकशी करण्याचे ठरवले आहे. त्याला किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी ऑडशेपची जागा सार्वजनिक कारणासाठी वापरली जात असेल तेथे प्रस्तावाचा विचार होणारच आहे. काही प्रस्तावात दंड आकारणी करणे शक्य आहे का, हेही तपासून पाहणार असल्याचे केंद्रेकर म्हणाले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी यांनी नियमात बसणारेच भूखंड द्यावेत, अशी मागणी असल्याचे सांगितले. नगरसेवक काशीनाथ कोकाटे म्हणाले, वाढते कुटुंब लक्षात घेऊन ऑडशेपच्या जागा द्याव्यात.