आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेसळीचा संशय, सिडकोतील डेअरीतून ८७० किलो तूप जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी सिडको एन-३ मधील अमोल डेअरीवर धाड टाकून ८७० किलो तूप तर १५० किलो खवा जप्त केला. भेसळीच्या संशयावरून प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या डेअरीमध्ये हे तूप कोणत्याही नावाच्या लेबलशिवाय विकले जात होते. ते आरोग्यास घातक ठरू शकते. यामुळे नागरिकांनी विनालेबल आणि विनापावती तुपाची खरेदी करू नये, असे अावाहन प्रशासनाने केले आहे.

सिडको एन-३ येथील अमोल डेअरी येथे भेसळयुक्त शुद्ध तूप विकले जात असल्याची माहिती अन्न आैषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यावरून प्रशासनाचे सहआयुक्त चं.भा. पवार आणि सहायक आयुक्त (अन्न) अ.जि.पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. राम मुंडे दामोदर केदार यांनी अमोल डेअरीववर छापा मारून तूप आणि खव्याचे नमुने घेतले. भेसळीच्या संशयावरून २,६०,७६० रुपये किमतीचे ८७० किलो तूप आणि २४, हजारांचा १५० किलो खवा जप्त केला. प्रशासनाने विचारणा केली असता डेअरीकडे कोणताही परवाना आढळला नाही. अन्न पदार्थ कोणाकडून खरेदी केले याच्या पावत्याही आढळल्या नाहीत. यामुळे भेसळीच्या संशयावरून ही कारवाई केल्याचे मुंडे यांनी सांगितले.
अमोल डेअरीत आढळलेले तूप १५ किलोच्या लेबल नसलेल्या डब्यांत, होलसेल पॅकमध्ये शक्यतो एवढ्या मोठ्या प्रमाणातील तूप मिठाई उत्पादकांना विकण्यासाठी ठेवले असावे. नियमाप्रमाणे यावर कोठून आले, काेणी निर्मिती केली, याचा तपशील असायला हवा होता. मात्र, तो नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात सुटे तूप विक्री केले जाते. तुपातील भेसळ तपासण्यासाठी घरगुती उपाय नाहीत. त्यास प्रयोगशाळेतच तपासावे लागते. यामुळे असे सुटे तूप विकत घेऊ नका. घेतलेच तर त्याचे बिल घ्या. संशय वाटला तर अन्न औषध प्रशासनाला माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कारवाईला गती देणार
सणासुदीच्या दिवसात भेसळीचे प्रमाण वाढते. यामुळे शहरासह जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या अन्नपदार्थांवर आमची कडक नजर राहील. कोणालाही भेसळीचा संशय वाटला तर त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. कारवाई करू. -डॉ.राम मुंडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग
बातम्या आणखी आहेत...