आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Adv. Prakash Ambedkar Press Conference At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांनी कोर्टाचे आदेशही झुगारले; अँड. आंबेडकर यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: पीईएस संस्थेच्या सिद्धार्थ महाविद्यालयात जाण्यास आम्हाला मज्जाव करून पोलिसांनी न्यायालयाचे आदेश धुडकावले आहेत. पोलिस चुकीच्या लोकांना मदत क रीत आहेत, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
पोलिसांनी आमच्याकडे सात दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे आठवड्यानंतर आम्ही यासंदर्भात पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिद्धार्थ संस्थेतील ट्रस्टीबद्दल धर्मादाय आणि न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागलेला असल्याने पोलिसांनी आमच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते. मात्र, राजकीय दबावापायी आमच्याच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, हे चुकीचे आहे.
गरिबांना धान्य देण्याची वेळ येते तेव्हा सरकार कर्जबाजारी असल्याचे दाखवले जाते, तर दुसरीकडे उद्योजकांना कोट्यवधींची सबसिडी दिली जात आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार केवळ साखर उद्योगांना पाठीशी घालणारे नेते असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. अंबाजोगाई येथील पोटनिवडणुकीत रंजना बनसोडे यांना भारिप बहुजन महासंघाने उमेदवारी दिली आहे. आमदार हरिभाऊ भदे त्यांचा प्रचार करीत असून पुढच्या आठवड्यानंतर आपणही प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. आंबेडकरांनी पोलिस कोठडीत असलेले अमित भुईगळ यांची भेट घेतली. या पत्रकार परिषदेला प्रा. अविनाश डोळस, गौतम लांडगे, अँड. रमेशभाई खंडागळे यांची उपस्थिती होती.