आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूमीहीन शेतमजुरांचा \'हक्क\' हरपला, अॅड. एकनाथ आव्हाड यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील आघाडीचे शिलेदार आणि भुमीहिन शेतमजुरांना हक्काची जमीन मिळवून देणारे कर्ते नेते अॅड. एकनाथ आव्हाड यांचे हैदराबाद येथे निधन झाले आहे. सोमवारी सकाळी 8.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अल्सरचा त्रास होत असल्याने हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मराठवाड्यात आणि विशेषतः बीडमध्ये अॅड. आव्हाड यांनी भुमीहिन दलित आणि शेतमजुरांना गायरान जमीन मिळवून देण्यासाठी लढा उभारला होता. त्यांनी 50 हजार दलितांना हक्काची जमीन मिळवून दिली. 'जग बदल घालूनी घाव' हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. मानवी हक्क अभियानाचे संस्थापक एकनाथ आव्हाड यांचा दलित - पुरोगामी चळवळीत सक्रीय सहभाग होता. त्यांच्या निधनाने चळवळीचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. महाराष्ट्रात पोतराज प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला होता.

अॅड. आव्हाड यांना चळवळीत जीजा या नावाने ओळखले जाते. त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजवाणी करण्यासाठी सुरुवातीला लढा उभारला होता. त्यानंतर भुमीहिन दलितांना शेतजमीन मिळवून देण्यासाठी ते लढले. यासाठी त्यांनी अमेरिकेत जाऊन तेथील कायद्याचाही अभ्यास केला होता. दुष्काळ निवारणासाठी त्यांनी अष्टी ते नागपूर अशी 'दुष्काळ हटवा - माणूस जगवा' रॅली काढली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास असलेल्या एकनाथ आव्हाड यांनी बौद्ध धम्माचा स्विकार करुन अनेकांना बौद्ध धम्मात आणण्याचे काम केले. त्यासोबतच पारधी आणि इतर गुन्हेगारी जमात असा ठपका असलेल्या जातीतील कुटुंबाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. दलित समाजातील अनेक जातीच्या लोकांना बौद्ध धम्माकडे वळण्याचे आवाहन ते करत होते.
बातम्या आणखी आहेत...