आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅड. घाणेकर प्रकरण, तिची तक्रार टाळण्यासाठी केला गोळीबाराचा बनाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आपल्याकडे ज्युनियरशिप करणारी महिला वकील आपल्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार करणार आहे, याची कल्पना अॅड. नीलेश घाणेकरांना मिळाली होती. या तक्रारीतून सुटका करून घेण्यासाठी आणि महिलेला दुसऱ्या प्रकरणात अडकवता येईल म्हणून शार्प शूटर राजू जहागीरदारचा आधार घेऊन मी गोळीबार घडवून आणला, अशी कबुली घाणेकरांनी पोलिसांना दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
गोळीबाराच्या दिवशी घाणेकर नगर जिल्ह्यात एका खटल्यासाठी म्हणून गेले होते येताना ते नेवासा फाट्यावर थांबले. तेथे त्यांनी राजू जहागीरदारचा मुलगा मुजफ्फर ऊर्फ सोनू याच्याशी बोलणी केली, मला दोन गोळीबार करणारे व्यक्ती आणि पिस्तूल पाहिजे असे सांगितले. ही माहिती सोनूने राजू जहागीरदार याला दिली, त्यानुसार कट रचला गेला. या कटात राजू जहागीरदारसह समीर पठाण आणि मुजीब सय्यद मोईनोद्दीन यांना सामील करून घेण्यात आले.
गोळीबाराच्या दिवशी शेवटची बैठक ही मोबीनपुरा येथे झाली. घटनास्थळी मोबाइल लोकेशन मिळू नये म्हणून त्या ठिकाणी मुजीब आणि समीर यांनी दोघांचे मोबाइल राजू जहागीरदार याच्या गाडीत ठेवले आणि घटनास्थळी रवाना झाले. ठरल्यानुसार घाणेकरांवर मुजीबने गोळीबार केला त्याने झाडलेली गोळी ठरल्यानुसार घाणेकरांच्या शर्टच्या बाहीला चाटून गेली आणि समीरने घाणेकरांच्या गाडीवर गोळीबार केला. दिशाभूल करण्यासाठी म्हणून दौलताबादच्या दिशेने निघून गेले. जाताना पडेगाव येथे कासंबरी दर्ग्याजवळ मुजीब याने पिस्तूल जमिनीत गड्डा करून पुरून ठेवले. या प्रकरणातील एक पिस्तूल, दुचाकी आणि मुजफ्फर आणि सोनू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहिलेले एक पिस्तूल पोलिसांना जप्त करणे बाकी आहे. या शिवाय या प्रकरणातील फरार आरोपी समीर पठाण आणि राजू जहागीरदार यांचा शोध पोलिस घेत आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सपोनी गजानन कल्याणकर, सुभाष खंडागळे तपास करत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अॅड. नीलेश घाणेकरची हर्सूलमध्ये रवानगी....